कुंडलवाडी(मो.अफजल) केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा येथे 21अॉगस्ट रोजी जिल्हा परिषद हायस्कूल मुख्याध्यापक डी.पी.शेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याध्यापक निरडवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत कुंडलवाडी केंद्राचे केंद्र प्रमुख तथा विस्तार अधिकारी वाय.एस.कौठकर परीसरातील चालू असलेल्या शिक्षण परिस्थितीती बद्दल मुख्याध्यापक यांच्या कडून आढावा घेतले.मार्गदर्शन / सुचना केले.
यावेळी उपस्थित मुख्याध्यापक यांना मार्गदर्शन करताना कौठकर म्हणाले 28 एप्रिल,15,24
जून आदी शासन निर्णय मुख्याध्यापक वाचून शिक्षकाना मार्गदर्शक करून शाळेत ठेवून बजावणी करण्यात यावे.शैक्षणिक दिनदर्शिका सर्व विद्यार्थ्या पर्यंत पोहचवीण्यात यावे.पालकाशी,फोन,व्हिडिओ काॅल,ग्रुप काॅल,करून संवाद साधावा.आणि शैक्षणिक दिनदर्शिका वापरून विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास मार्गदर्शन करावे.सर्वेक्षणानुसार पट नोदनी व प्रत्येक्ष प्रवेश इयत्ता पहिली वर्गाचा आढावा व विद्यार्थी यादी घेण्यात यावे.
केंद्र अंतर्गत शाळेतील 1007 विद्यार्थ्यी पर्यंत पुस्तक पोहोचले का खात्री करून आढावा घेण्यात आला.वृक्षारोपण एक मुल एक झाड उदिष्टे पुर्ण करावे सुचना देण्यात आले,ऑनलाइन व ऑफलाईन शिक्षण या विषयी आढावा घेण्यात आला.ईयत्ता 5 वी व 8 वी शिषवृर्तीसाठी 100% मुले बसविण्यात यावे.शिषवृर्ती वर्ग नियोजन करून विद्यार्थ्यांना विषय निहाय अभ्यासक्रम देण्यात यावे.डीजीटल शाळेतील उपक्रमे चालू स्थीतीत ठेवावी.सर्व विद्यार्थ्यांचे आधार लिंक करावी.ग्रंथालयातील पुस्तके विद्यार्थ्यांना देण्यात यावे.आशा सुचना वजा मार्गदर्शन करण्यात आले आहे.
यावेळी कुंडलवाडी केंद्र अंतर्गत शाळेती सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा