१८ ऑगस्ट २०२०

खऱ्या संतांची शिकवण विसरुन भक्तीचा बाजार मांडणाऱ्या भोंदूबाबांच्या मागे लागू नका;अॕड हलकारे

 
मराठवाडा विभागीय अंनिसचे शिबीर संपन्न

बिलोली (तालुका प्रतिनिधी) 
         संत नामदेव, ज्ञानोबा, तुकोबा पासून ते संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराजां सारख्या खऱ्या संतांची अनिष्ट, अघोरी प्रथांवर वार करणारी वारकऱ्यांची समतेची, जनजागरणाची खरी शिकवण विसरून, भक्तीचा बाजार मांडणाऱ्या आजच्या भोंदूबाबांच्या मागे लागू नका, असे आवाहन अंनिसचे राष्ट्रीय सल्लागार तथा प्रख्यात वक्ते अॕड गणेश हलकारे यांनी मराठवाडा विभागीय शिबिरात संत कुणाला म्हणावे? या विषयावर व्याख्यान देतांना केले.
        अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मराठवाडास्तरीय वैज्ञानिक दृष्टीकोन विकास आणि जादूटोणा विरोधी कायदा तीन दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण शिबिर नुकतेच संपन्न झाले.यात ७१९ शिबिरार्थींनी नोंदणी केली प्रत्यक्षात ११०८ दर्शकांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
         यामध्ये नशीब,भूत, भानामती, मंत्रतंत्र, करणी, जादूटोणा, बुवाबाजी, चमत्कार, देव-देवी अंगात येणं, नेमकं काय असते? याबाबत जादूटोणा विरोधी कायदा काय सांगतो? यावर समितीचे राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे, राज्य युवा संघटक पंकज वंजारे, मराठवाडा प्रमुख किशोर वाघ यांनी चमत्कार प्रात्यक्षिके व प्रश्नौत्तरांसह ३ दिवस अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
          यावेळी बोलतांना हरिभाऊ पाथोडे यांनी समितीचा देवाधर्माला विरोध नसून देवाधर्माच्या नावावर सामान्य माणसाची फसवणूक करणाऱ्यांना आहे.तर पंकज वंजारे म्हणाले की कोणताही चमत्कार सिद्ध करा  समितीचे 25 लाख रुपयांचे बक्षीस जिंका. मराठवाडा प्रमुख किशोर वाघ यांनी देशातील पहिले ऑनलाइन ३ दिवसीय यशस्वी शिबिर घेणाचा सन्मान मिळवणाऱ्या मराठवाडा आयोजन समितीचे आणि विभागातील सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
         शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी तांत्रिक व्यवस्था प्रमुख नरेंद्र पाटील, इंजि.प्रशांत वेडेकर,औरंगाबाद जिल्हा प्रमुख पंकज देशमुख, हिंगोली प्रमुख प्रकाश मगरे,जालना जिल्हा प्रमुख सुनिल वाघ,बीड प्रमुख प्रा.सचिन झेंडे,नांदेड जिल्हा प्रमुख प्रा.इरवंत सुर्यकार, यांच्यासह प्रा.भिसे सर,पांडुरंग मोमिदवार,पत्रकार गंगाधर कुडके,शिद्बोधन कापसीकर अखिल भारतीय अंनिसच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...