कुंडलवाडी प्रतिनिधी (मो.अफजल)
फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक व माध्यमिक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यामध्ये के रामलू शाळेतील 27 विध्यार्थी पात्र ठरले आहे.
या मध्ये इ. 8 व्या वर्गातून कु. गजानन पत्तेवार यास 230, कु. विष्णू आरसेवार 222, कु. अश्विनी म्याकलवार 220, कु. कृष्णा वाडकर 208, कु. निकिता म्याकलवार 206 व ऋत्विक ताटे यास 188, रितेश ठक्कुरवार 168, पवन ठक्कुरवार, श्रुष्टि भोरे, वैष्णवी गायकवाड, योगेश दीडशेरे, आशिष फुलारी विध्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत. सदर हि परीक्षा 300 गुणांची घेण्यात आली होती व तसेच इ. 5 व्या वर्गातील वैभव जोशी यास 158, लालू पिंगळे 152, शालिनी बोंबले 144, सुरज देगावे 138 व सौरभ भंडारे 138, संकेत अष्टमवार, सिमंतिनी कोंडावार, श्रीनिवास डोंगरे, श्रद्धा पिंगळे, मनीषा गोरगले, पवन गायकवाड, रमेश श्रीरामे, मारोती आकुलवार,अंजली सुरनरे व तेजस्विनी लिंगमपल्ले हे विध्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत.
या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष सायन्ना राजाराम ठक्कुरवार सचिव यशवंत संगमवार संचालिका रमा ठक्कुरवार मुख्याध्यापक अविनाश गुजेवाड प्राचार्य अभिलाष गौसूला, राजेश कागळे सर व शाळेतील सर्व शिक्षक वृन्द आदिनी सर्व विद्यार्थ्यांचे व या विद्यार्थ्यांस मार्गदर्शन करणारे अभिलाष गोसूला, श्रीनिवास पोटपेल्लीवार, संतोष फुलारी, पापय्याअप्पा मठवाले, रमेश कासलोड आदि शिक्षिकांचे सुद्धा कौतुक केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा