शिक्षक ते पत्रकार असा यशस्वी प्रवास
दौलत उत्तमराव पा. पांडागळे यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1988 मध्ये झाला.यांचे शिक्षण BA. D. ed झाले आहे.12 वि पर्यंतचे शिक्षण त्यांचे मूळ गावी भीमाशंकर विद्यालाय शिराढोण येथे तर D.ed राष्ट्रीय अध्यापक विद्यालय नागपूर येथून 2009 मध्ये पूर्ण झाले आहे.त्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासकेंद शिराढोण येथून BA ची पदवी प्राप्त केली.सध्या ते त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय उस्माननगर येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
लहानपणापासून त्यांच्या आई वडीलाकडून त्यांना नैतिकतेचे धडे मिळाले.अभ्यासामध्ये पण आवड होती.इंग्रजी विषय सर्वात आवडीचा आहे म्हणून त्यांनी आपल्या सेवेत अनेक ग्रामीण भागातील मुलांना इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवून दिले.या काळात त्यांनी आपण आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून ग्रामीण भागातील गोरगरीब लोकांच्या समस्याना वाचा फोडण्यासाठी मागील काही वर्षांपासून पत्रकारिता सुरू केली व अनेक प्रश्न मार्गी लावले.विशेष करून शैक्षणिक सेवेतील अनुभव असल्याने त्यांनी शिक्षण क्षेत्रातील अनेक समस्या आपल्या लेखणीतून व्यक्त केल्या व प्रसंगी चांगल्या कामाचे पण कौतुक केले आहे.शेतकरी,मजूर,यांचे पण प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपल्या लेखणीतून त्या समस्या मांडल्या.वेळप्रसंगी कठोर भूमिका घेऊन ते कधी कधी पत्रकारिता करतात.कोणाच्या भूल थापाना कधीही बळी न पडणारा,सत्य ते सत्य म्हणणारा पत्रकार म्हणून त्यांनी आपली ओळख ग्रामीण भागात त्यांनी निर्माण केली आहे.
मध्यंतरीच्या काळात त्यांनी अनेक संकटाचा सामना केला पण प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि कौटुंबिक पाठबळावर त्यांनी सर्व गोष्टीवर मात करून आज एक आदर्श शिक्षक व निर्भीड पत्रकार म्हणून समाजात आदर्श आहेत.
शिक्षण क्षेत्रात काम करत असताना सुद्धा त्यांनी अतिशय तळमळीने विद्यार्थी घडवण्याचे काम करतात.सर अतिशय विदयार्थी प्रिय आहेत.सर्वजण त्यांना दौलत सर या नावाने ओळखतात.
पत्रकार दौलत पांडागळे यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त मी पाहिलेला अनुभवलेला हा व्यक्ती आपल्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा अतिशय मनस्वी,निर्मळ व स्पस्ट वक्ता म्हणून ओळखला जातो.सर आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
शुभम डांगे शिराढोणकर
मो.7774834052
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा