शिवराज भंडरवाड यांना जीवन रक्षक पुरस्कार
मांजरम गावाचा विद्यार्थी शिवराज रामचंद्र भंडरवाड (१० वी) यांना भारत सरकार कडून दिला जाणारा राष्ट्रीय जीवन रक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे
हा पुरस्कार दिल्ली येथे राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या उपस्थितीत भव्य समारंभात झाला असता पण कोरोना महामारी मुळे सर्व कार्यक्रम रद्द केल्यामुळे केंद्र सरकारच्या वतीने राज्य सरकारकडे हा पुरस्कार पाठवण्यात आला आहे. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह ,प्रमाणपत्र व एक लक्ष रुपयांचा चेक असे आहे.
आज नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अशोकजी चव्हाण व जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्या हस्ते हा पुरस्कार नियोजन भवन नांदेड येथे देण्यात आला. यावेळी त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा सामूहिक सत्कार करण्यात आला.
यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, महानगरपालिका आयुक्त सुनील लहाने ,रेखाताई काळम-पाटील , गंपुराज घुमे, बी. पी.बनवणे रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे, विशाल पा. शिंदे, सोनकांबळे सर ( मुख्याध्यापक), शहाणे सर( तलाठी) व शिवराजचे नातेवाईक उपस्थित होते .
कु.शिवराज ने गेल्यावर्षी नाल्यात वाहता जाणाऱ्या दोन व्यक्तीचा जीव वाचवला होता त्यामुळे भारत सरकारने जीवन रक्षक पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
हा पुरस्कार मिळवा म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक सोनकांबळे सर यांनी विशेष प्रयत्न केले.रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी मंत्रालयात राज्याचे माजी कृषिराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे पाठपुरावा केला होता ,मागच्या सरकारच्या काळात केंद्राकडे पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर केला गेला होता. जिल्हा परिषद नांदेड यांनी सुद्धा विशेष ठराव घेऊन शासन स्तरावर प्रयत्न केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा