०४ ऑक्टोबर २०२०

आयुष भारत चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी यांचे मार्गदर्शन घेऊन आयुष भारत देशात बळकट करणार- डॉ.नामदेव मोरे



अहमदनगर : प्रतिनिधी
आयुष भारत चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी यांचे मार्गदर्शन घेऊन देशात आयुष भारत संघटना बळकट करणार आहे. असे प्रतिपादन आयुष भारत चे राष्ट्रीय सचिव डॉ.नामदेव मोरे यांनी केले आहे.
पुण्याहून जालनाकडे जाताना अहमदनगर येथे डॉ.फैजान इनामदार यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना सांगत होते. यावेळी आयुष भारत चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.फैजान इनामदार, महाराष्ट्र राज्य नॅचरोपॅथी अध्यक्ष डॉ.जलील शेख, बीड जिल्हा अध्यक्ष डॉ.फैजान शेख, डॉ. विश्वास फापाळे, डॉ.सुहास शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते डॉ.फैजान इनामदार त्यांच्या सहकार्यांनी डॉ.नामदेव मोरे यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी डॉ.नामदेव मोरे म्हणाले,
आयुष भारत ला देशात बळकट करणार आहे.
आयुर्वेद, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, योगा, युनानी, सिद्धा, पैरामेडिकल, अल्टरनेटिव मेडिसिन व इलेक्ट्रोपॅथी आणि अदी पॅथी मध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या व्यक्तीं वरती अन्याय होऊ देणार नाही आणि आम्ही हे अन्याय मुळीच सहन ही करणार नाही आमचे हक्क आम्हाला मिळालेच पाहिजेत चुकीच्या कारवाया केल्या तर गप्प बसणार नाही वेळ आली तर आम्ही शेवटच्या टोकाला जाण्यासाठीची ही तयारी केली आहे. डॉ.नामदेव मोरे पत्रकारांशी बोलताना सांगत होते. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.आमिर मुलानी यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत.
त्यामुळेच मी आयुष भारत संघटने मध्ये सातत्याने काम करु शकत आहे. देशातील सर्व राज्यातील डॉक्टरांनी मार्गदर्शन करण्यासाठी पुढे यावे, असे मोरे म्हणाले. 
आयुष भारत चे महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यातील अध्यक्ष अहमदनगर येथे कार्यक्रमास उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...