बिलोली
केंद्रीय राखीव बल या भारतीय संरक्षण सेवेत असलेल्या बिलोली शहरातील शंकरराव मुंडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बिलोली शहरातील माता भक्तांना वक्रतुंड मेडीकल नांदेडच्या वतीने हँन्ड सँनिटायझचे वाटप करण्यात आले.
बिलोली शहरातील सेवा सहकारी सोसायटीच्या जेष्ठ संचालीका श्रीमती भागरथबाई बसवंतराव मुंडकर यांचे जेष्ठ पुञ शंकरराव बसवंतराव मुंडकर हे गेल्या ३० वर्षापासून केंद्रीय राखीव बल मध्ये काम करत आहेत.केंद्रीय राखीव बलाच्या माध्यमातून देश सेवा करत असलेल्या शंकरराव मुंडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वक्रतुंड मेडीकल नांदेडच्या वतीने बिलोली शहरातील लघूळ मार्गावर असलेल्या महाशक्तीशाली दुर्गा माता मंदिर येथे सध्या देशासह जगभरात घालत असलेल्या कोरोना विषाणूपासून स्वतचे रक्षण करण्यासाठी उपयुक्त असलेल्या हँन्ड सँनिटायझरचे वाटप करण्यात आले.यावेळी जेष्ठ पञकार गोविंद मुंडकर,न.पा चे माजी उपाध्यक्ष खंडू खंडेराय,गंगाधर शिंदे,दिलीप उत्तरवाड,सौ.शकुंतला सुपारे,सौ.नंदा खंडेराय,ललिता मुंडकर,अर्चना खंडेराय,सौ.पुजा सुरेश खंडेराय यांच्यासह माता भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा