मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भोकर येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहीम संपन्न

भोकर - आज दि.३१ जानेवारी रोजी ग्रामीण रुग्णालय भोकर अंतर्गत भोकर शहर येथे ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली.  डॉ अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एकुण २१ टिम, ६३ कर्मचारी द्वारे एकुण ४२०३ लाभार्थी पैकी  ३८१९ लाभार्थी  (९०.८६ टक्के) व ४ ट्रांझिट टिम, ८ कर्मचारी यांच्या कडून १७२ बालकांना लस पाजविण्यात आली.  ग्रामीण रुग्णालय भोकर येथील डॉ अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक,डॉ संतोष अंगरवार, डॉ बाळासाहेब बिराडे, डॉ राजाराम कोळेकर, डॉ व्यंकटेश टाकळकर, डॉ अर्पणा जोशी, डॉ अविनाश गुंडाळे, डॉ मुद्शीर श्री थोरवट वैद्यकीय अधिकारी, सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य पर्यवेक्षक, मनोज पांचाळ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, श्रीमती मंदा चव्हाण परिसेविका, श्रीमती वैशाली कुलकर्णी अधिपरीचारीका, मल्हार मोरे, श्री रावलोड गिरी, पुलकंठवार व्यंकटेश आरोग्य सहाय्यक,पांडुरंग तम्मलवाड, विशांभर जैरमोड,प्रदिप गोधने, नामदेव कंधारे आरोग्य कर्मचारी, श्रीमती मुक्ता गुट्टे, श्रीमती संगीता पंदीलवाड, श्रीमती वर्षा राऊत, सुरेश डुमलवाड, प्रकाश भक्ते, गणेश...

कोविड लसीकरण ग्रामीण रुग्णालय भोकर येथे सुरुवात

  भोकर - आज दि.२८ जानेवारी रोजी ग्रामीण रुग्णालय भोकर येथे कोविड लसीकरण सुरुवात करण्यात आले.  पहिला टप्प्यात आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना कोविड लसीकरण करण्यात येणार आहे त्यानुसार आज ग्रामीण रुग्णालय भोकर व  प्राथमिक आरोग्य केंद्र भोसी अंतर्गत गावातील आरोग्य अधिकारी,आरोग्य कर्मचारी,अंगणवाडी, आशा व भोकर शहरातील खाजगी वैद्यकीय व्यवसायिक यांना कोविड लसीकरण करण्यात आले. भोकरचे तहसिलदार भरत सुर्यवंशी यांच्या हस्ते कोविड लसीकरणचे फित कापून उद्घाटन करण्यात आले.  सिरम ईन्सटुयूट कंपनीची कोविशिल्ड हि लस  लसीकरण करण्याकरीता वापरण्यात  आली. आज १०५ आरोग्य सेवेतील अधिकारी व कर्मचारी यांना कोविड लस देण्यात आली. यावेळी पी.एल.रामोड गटविकास अधिकारी, डॉ अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक, डॉ राहूल वाघमारे तालुका आरोग्य अधिकारी, डॉ राजाराम कोळेकर, डॉ उमेश जाधव,डॉ व्यंकटेश टाकळकर, डॉ अविनाश गुंडाळे, सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य पर्यवेक्षक, मनोज  पांचाळ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, श्रीमती मंदा चव्हाण, श्रीमती व...

वाकड पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोफत आयुर्वेदिक चिकित्सा व मार्गदर्शन शिबीर संपन्न

पुणे -  26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयुष भारत आणि आय एम सी यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी 10 ते दुपारी 05 या वेळेत वाकड पोलीस स्टेशन येथे सर्व पोलीस अधिकारी व बांधवांसाठी मोफत सर्व शरिराची तपासणी व मार्गदर्शन मोफत आयुर्वेदिक औषधे शिबिराचे आयोजित करण्यात आले होते. आयुर्वेदिक चिकित्सा शिबीराचे आयोजन डॉ.ज्योती शिरसाट आयुष भारत पुणे जिल्हा अध्यक्ष व आय एम सी चेअरमन यांच्या वतीने मोफत चिकित्सा शिबीर घेण्यात आले. पोलीस कर्मचारी या शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ.ज्योती शिरसाठ यांनी उपस्थित असणाऱ्या सर्व पोलीस कर्मचारी यांचे सर्व आरोग्य तपासण्या करून त्यांना विविध आजारांवर आयुर्वेदिक उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले,  वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.विवेक मुगळीकर यांच्या अध्यक्षतेखाली आयुर्वेदिक चिकित्सा शिबीर वाकड पोलीस स्टेशन येथे पार पडले.

फायर सेफ्टी अंतर्गत ग्रामीण रुग्णालय भोकर येथे प्रशिक्षण

भोकर - भंडारा येथील घटने नंतर जिल्ह्यातील रुग्णालयाचे फायर सेफ्टी ऑडिट व प्रशिक्षण देण्या बाबत डॉ विपीन इटनकर जिल्हाधिकारी नांदेड यांनी सुचित केल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर यांनी रुग्णालयाचे फायर सेफ्टी ऑडिट व प्रशिक्षण देण्या बाबत आदेशीत केल्यानंतर आज दि.१७ जानेवारी रोजी ग्रामीण रुग्णालय भोकर  येथे नांदेड येथील  शेख रईस पाशा अग्निशमन अधिकारी व श्री जोंधळे  यांनी ग्रामीण रुग्णालय भोकर येथील डॉक्टर, अधिकारी, स्टॉप नर्स व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रात्यक्षिक श्रीमती राजेश्री ब्रहामणे अधिपरीचारीका व श्री संतोष मामीडवार शिपाई यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी डॉ अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक, डॉ संतोष अंगरवार,डॉ व्यंकटेश टाकळकर, डॉ मुद्शीर, डॉ थोरवट,  सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य पर्यवेक्षक, श्रीमती मंदा चव्हाण परिसेविका, श्रीमती वैशाली कुलकर्णी  श्रीमती राजेश्री ब्रहामणे, श्रीमती सुनिता शहाणे, श्रीमती मंगल भोसले,श्रीमती निर्मला कोकणी, श्रीमती बोडेवाड, श्रीमती राऊत, श्रीमती बकेवाड,श्रीमती ज्योती शेंडगे, श्रीमती...

डॉ.शाड्रा डिसोजा यांची आयुष भारत महाराष्ट्र राज्य पंचगव्य अध्यक्ष पदी निवड

सोलापूर : आयुष भारत महाराष्ट्र राज्य पंचगव्य अध्यक्ष पदी डॉ.शाड्रा डिसोजा यांची निवड करण्यात आल्याची माहिती आयुष भारत राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.आमीर मुलाणी यांनी दिली. संपूर्ण देशात कार्यान्वित असणारी ग्रामीण तसेच शहरातील डॉक्टरांच्या न्याय हक्कासाठी लढणारे देशातील सर्वात मोठी आयुष भारत संघटना आहे. आयुष भारत संघटनेची कार्य आणि उद्दिष्ट असे आहे आयुष भारत फिरते हॉस्पिटल तसेच औषधांवर संशोधन, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वैद्यकीय शिक्षण पुरवणे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये नोकरी, वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व डॉक्टरांसाठी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षण संस्थांची उभारणी करणे, गरीब लोकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा पुरवणे, 24 तास मोफत ॲम्बुलन्स सेवा पुरवणे, डॉक्टरांवर होणाऱ्या अन्यायावरती त्वरित मदत करणे, डॉक्टरांना वैद्यकीय कायद्याविषयी मोफत सल्ला देणे. तसेच डॉक्टरांच्या समस्या डॉक्टरांचे विविध प्रश्न यासाठी कार्य करणारी देशातली सर्वांत मोठी आयुष भारत संघटना ओळखली जात आहे. अशी माहिती आयुष भारत महाराष्ट्र राज्य पंचगव्य अध्यक्ष डॉ.शाड्रा डिसोजा यांनी दिली.