२८ जानेवारी २०२१

कोविड लसीकरण ग्रामीण रुग्णालय भोकर येथे सुरुवात

 

भोकर - आज दि.२८ जानेवारी रोजी ग्रामीण रुग्णालय भोकर येथे कोविड लसीकरण सुरुवात करण्यात आले.  पहिला टप्प्यात आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना कोविड लसीकरण करण्यात येणार आहे त्यानुसार आज ग्रामीण रुग्णालय भोकर व  प्राथमिक आरोग्य केंद्र भोसी अंतर्गत गावातील आरोग्य अधिकारी,आरोग्य कर्मचारी,अंगणवाडी, आशा व भोकर शहरातील खाजगी वैद्यकीय व्यवसायिक यांना कोविड लसीकरण करण्यात आले.
भोकरचे तहसिलदार भरत सुर्यवंशी यांच्या हस्ते कोविड लसीकरणचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. 
सिरम ईन्सटुयूट कंपनीची कोविशिल्ड हि लस  लसीकरण करण्याकरीता वापरण्यात  आली.
आज १०५ आरोग्य सेवेतील अधिकारी व कर्मचारी यांना कोविड लस देण्यात आली.

यावेळी पी.एल.रामोड गटविकास अधिकारी, डॉ अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक, डॉ राहूल वाघमारे तालुका आरोग्य अधिकारी, डॉ राजाराम कोळेकर, डॉ उमेश जाधव,डॉ व्यंकटेश टाकळकर, डॉ अविनाश गुंडाळे, सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य पर्यवेक्षक, मनोज  पांचाळ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, श्रीमती मंदा चव्हाण, श्रीमती वैशाली कुलकर्णी, पांडुरंग तम्मलवाड,मल्हार मोरे, अतुल आडे, शेख साबेर, शिंगनवाड श्रीमती संगिता महादळे अधिपरीचारीका यांनी सर्वांना लसीकरण केले. ग्रामीण रुग्णालय भोकर, तालूका आरोग्य अधिकारी कार्यालय, प्रा.आ.केंद्र भोसी येथील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...