पुणे - 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयुष भारत आणि आय एम सी यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी 10 ते दुपारी 05 या वेळेत वाकड पोलीस स्टेशन येथे सर्व पोलीस अधिकारी व बांधवांसाठी मोफत सर्व शरिराची तपासणी व मार्गदर्शन मोफत आयुर्वेदिक औषधे शिबिराचे आयोजित करण्यात आले होते.
आयुर्वेदिक चिकित्सा शिबीराचे आयोजन डॉ.ज्योती शिरसाट आयुष भारत पुणे जिल्हा अध्यक्ष व आय एम सी चेअरमन यांच्या वतीने मोफत चिकित्सा शिबीर घेण्यात आले. पोलीस कर्मचारी या शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ.ज्योती शिरसाठ यांनी उपस्थित असणाऱ्या सर्व पोलीस कर्मचारी यांचे सर्व आरोग्य तपासण्या करून त्यांना विविध आजारांवर आयुर्वेदिक उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले, वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.विवेक मुगळीकर यांच्या अध्यक्षतेखाली आयुर्वेदिक चिकित्सा शिबीर वाकड पोलीस स्टेशन येथे पार पडले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा