भोकर - आज दि.३१ जानेवारी रोजी ग्रामीण रुग्णालय भोकर अंतर्गत भोकर शहर येथे ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
डॉ अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एकुण २१ टिम, ६३ कर्मचारी द्वारे एकुण ४२०३ लाभार्थी पैकी ३८१९ लाभार्थी (९०.८६ टक्के) व ४ ट्रांझिट टिम, ८ कर्मचारी यांच्या कडून १७२ बालकांना लस पाजविण्यात आली.
ग्रामीण रुग्णालय भोकर येथील डॉ अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक,डॉ संतोष अंगरवार, डॉ बाळासाहेब बिराडे, डॉ राजाराम कोळेकर, डॉ व्यंकटेश टाकळकर, डॉ अर्पणा जोशी, डॉ अविनाश गुंडाळे, डॉ मुद्शीर श्री थोरवट वैद्यकीय अधिकारी, सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य पर्यवेक्षक, मनोज पांचाळ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, श्रीमती मंदा चव्हाण परिसेविका, श्रीमती वैशाली कुलकर्णी अधिपरीचारीका, मल्हार मोरे, श्री रावलोड गिरी, पुलकंठवार व्यंकटेश आरोग्य सहाय्यक,पांडुरंग तम्मलवाड, विशांभर जैरमोड,प्रदिप गोधने, नामदेव कंधारे आरोग्य कर्मचारी, श्रीमती मुक्ता गुट्टे, श्रीमती संगीता पंदीलवाड, श्रीमती वर्षा राऊत, सुरेश डुमलवाड, प्रकाश भक्ते, गणेश गोदाम, बत्तलवाड,गायकवाड, रामराम जाधव, संतोष मामीडवार, राजू चव्हाण, खोकले, ग्रामीण रुग्णालय, हत्तीरोग कर्मचारी व अंगणवाडी कर्मचारी यांनी यशस्वी रित्या संपन्न केला.
हिमायतनगर तालुक्यात पल्स पोलिओ लसीकरणास बालकांचा प्रतिसाद
उत्तर द्याहटवाग्रामीण भागात ठिकठिकाणी आरोग्य विभागाने राबविली यशस्वी मोहिम
तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रा.आ. केंद्र सरसम व चिचोर्डी अंतर्गत 0 ते 5 वयोगटातील बालकांना दयावयाचे डोसचे उदिष्ट्र हे 9122 हे होते. यातील 8566 बालकांना पोलिओचे डोस देऊन 94 टक्के उदिष्ट्र पुर्ण करण्यात आले यासाठी ग्रामीण भागात 107 बुथ तयार करण्यात आले अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एस.पी. पोहरे, डॉ. अनिल पोपुलवार , डॉ. श्रुती जाधव, डॉ.आंनद जाधव, आशा समन्वय श्री कृष्णा पांडुरंग चौधरी, आरोग्य सहायक श्री नाईक, श्री सचिन देशमुख, श्री सौदागर अफरोज, श्री हराळे, श्रीमती जोशी, श्रीमती राठोड, श्री लंकलवाड यांनी माहिती दिली. सदरील पल्स पोलिओ मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्व अधिकारी तसेच सर्व आरोग्य कर्मचारी , गट प्रवर्तक, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा स्वंयसेविका यांनी परिश्रम घेतले.
Himayatnagar News Today pulse polio Immunization
हटवा