भोकर - आज दि. ३१ मे रोजी जागतिक तंबाखू नकार दिना निमित्त ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा करण्यात आला.
दि.३१ मे हा दिवस सर्व आरोग्य संस्थेमध्ये *" जागतिक तंबाखू विरोधी दिवस "* म्हणून साजरा करण्याचे निर्देश वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आले व भारत सरकारच्या सन २००३ कोटूपा कायदा माहिती, तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम याची माहिती व तंबाखू विरोधी प्रतिज्ञा वाचन डॉ राजाराम कोळेकर दंत चिकित्सक यांनी केले व सर्वांनी प्रतिज्ञा घेण्यात आली.
यावेळी डॉ अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक, डॉ सारीका जेवळीकर, डॉ बाळासाहेब बिऱ्हाडे, डॉ अपर्णा जोशी, सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य सहाय्यक, मनोज पांचाळ, अत्रिनंदन पांचाळ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, कु.रोहिणी भटकर क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी, श्रीमती मंदा चव्हाण, राजश्री ब्राम्हणे, संगिता महादळे, ज्योती शेंडगे, दिवटे, संगिता पंदिलवाड, मुक्ता गुट्टे, वर्षा राऊत परिचारिका, विठ्ठल शेळके, संदिप ठाकूर, मल्हार मोरे, गिरी रावलोड औषध निर्माण अधिकारी,पांडुरंग तम्मलवाड, नामदेव कंधारे आरोग्य कर्मचारी, झाहेद अली, सुरेश डुम्मलवाड, सुधाकर गंगातीर आरोग्य मित्र आदी कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा