बिलोली -जि.प. सुनिल कदम
तालुक्यातील आळंदी येथिल जेष्ठ,निष्कलंक काँग्रेस कार्यकर्त्ते तथा एक मुरब्बी राजकारणी मसुद देशाई आळंदीकर यांची जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाउपाध्यक्षपदी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याहस्ते निवड करुन नियुक्तीपञ देण्यात आले आहे.पंचायतराज व्यवस्था अस्तित्वात आल्यापासून तब्बल ६० वर्षे ग्रामपंचायत देशाई कुटुंबीयांकडे राखुन गावचा सर्वांगीण विकास करुन ग्रामस्थांना शासकीय-खाजगी सुविधा गावातच उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्नशिल विकासपुरुष,तसेच दोनवेळा बिलोली तालुकाध्यक्षपद भुषविलेले आळंदीचे मसुद देशाई यांच्या कार्याची कृत्वावाची दखल घेत राज्याचे बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी मसुद देशाई यांची जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड केली आहे.बिलोली तालुक्यातील अटकळी येथे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.सदर निवडीबद्दल आ.अमरनाथ राजुरकर,माजी आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॕकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण,जि.प.अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर,जि.प.सभापती रामराव नाईक,सभापती संजयअप्पा बेळगे,जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटीलषा नागेलीकर,तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिंपळीकर,माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी,माजी सभापती प्रकाश पा.बडुरकर,माजी नगराध्यक्ष रणविरसिंग चौव्हाण,दिलीप पांढरे,प्रा.पांडुरंग रामपुरे,वलिओद्दीन फारुखी,मुन्ना पोवाडे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा