•पाळू वरील ओठे बांधकाम थांबविण्याचे दिले होते आदेश
• पाळू फुटून पावसाळ्यात गावात पाणी घुसण्याची शक्यतासगरोळी : येथिल ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतिने गेल्या काही दिवसांपासून गावाच्या मध्यभागी असलेल्या निझामकालीन पाझर तलावाच्या पाळूवर बाजार ओठे करण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली. मात्र पाळू फोडून बांधकाम करण्याची प्रक्रिया हाती घेतल्याने ही पाळू कमकुवत बनून भविष्यात पावसाळ्याच्या मोसमात या तलावातील पाणी गावात घुसण्याची शक्यता आहे. यामुळे भविष्यात होणारी हानी लक्षात घेऊन सदरील ठिकाणी बांधकाम करू नये असा अदेश उपविभागीय जलसंधारण अधिका-यांने ग्रामपंचायत कार्यालयास तब्बल दोन वेळा देऊनही याठिकाणी अजूनही बांधकाम केले जात असल्याने जलसंधारण अधिका-याच्या आदेशाला सगरोळी ग्रामपंचायतची केराची टोपली दाखवली आहे.
बिलोली तालुक्यातील सगरोळी हे मोठे बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. त्यामुळे याठिकाणी सगरोळी परिसरात व्यापारी व नागरिकांची खरेदी विक्रीसाठी नेहमीच वर्दळ असते. मात्र ही बाजारपेठ जूनी असल्याने येथे जाग्याची मोठी समस्या आहे, त्यामुळे व्यवसाय वाढीसाठी अडचणी उद्भवत आहेत, याच कारणास्तव सगरोळी येथे तलाव परिसरात पाळू खोदून गेल्या काही दिवसांपासून बाजार ओठे बांधकाम नाबार्डच्या आर्थिक सहाय्याने एक सेवाभावी संस्था करीत आहे, ही सगरोळी बाजारपेठेसाठी चांगले काम आहे. मात्र त्यांनी निझामकालीन पाझर तलाव खोदून बांधकाम चालू केले असल्याने भविष्यात याठिकाणी मोठी हाणी उद्भ्वण्याची दाट शक्यता आहे, तसेच या परिसरात गावातील केरकचरा, दवाखान्यातील टाकाऊ वस्तू, केसे, मेलेली जनावारे अशा अनेक बाबी याठिकाणी टाकल्या जातात त्यामुळे हे ठिकाणी घाणीचे साम्राज्य म्हणूनही परीचीत आहे. भविष्यात पाळू फुटून गावात पाणी घुसण्याच्या भितीने नायगावच्या उपविभागीय जलसंधारण अधिका-यांने ग्रामपंचायत कार्यालयास हे काम थांबविण्याचे आदेश तब्बल दोन वेळा देऊनही या ठिकाणी आजही काम केले जात आहे त्यामुळे जलसंधारण अधिका-याच्या आदेशाला सगरोळी ग्रामपंचायतने केराची टोपली दाखवले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा