२५ डिसेंबर २०१८

कु. सुप्रिया धुप्पे चे कथाकथन स्पर्धेत यश


बिलोली : जयराम अंबेकर विद्यालय अर्जापुर येथे पार पडलेल्या कथाकथन स्पर्धेत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय बिलोली ची विद्यार्थिनी कु सुप्रिया धुप्पेने  प्रथम क्रमांक पटकावला.शालेय पातळीवर वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात अग्रेसर असणाऱ्या जयराम अंबेकर विद्यालयाद्वारे सलग दुसऱ्या वर्षी ही दिनांक २४ डिसेंबर रोजी सकाळी  १० वाजता बिलोली, धर्माबाद ,देगलूर व नायगाव तालुक्यातील वर्ग ६ वी ते ९ वी ह्या गटातील विद्यार्थ्यांसाठी कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली.संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार गंगाधरराव पटणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ह्या स्पर्धेसाठी चारही तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवत एकापेक्षा एक सरस कथा सांगत उपस्थितांची दाद मिळविली परंतु कस्तुरबा गांधी विद्यालयाची विद्यार्थिनी कु सुप्रिया धुप्पे हिने परिक्षकांची पसंती मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. बक्षिसाचे स्वरूप असलेले रोख दोन हजार पाचशे रुपये व स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र ऍड गंगाधरराव पटणे यांच्या हस्ते विजेत्यास देऊन गौरविण्यात आले.कु सुप्रिया धुप्पे च्या यशाचे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सावळे मॅडम, मार्गदर्शक कोतवाड ए. एस. मॅडम सह सर्व थरातून अभिनंदन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...