३० डिसेंबर २०१८

सत्कार सुह्रदयी व्यक्तींचा अन् सन्मान माईचा या अंतर्गत बिलोली येथे सत्यपाल महाराजांच्या सत्यवाणीचे आयोजन

 बिलोली  - येथील सेवा सहकारी सोसायटीच्या जेष्ठ संचालिका श्रीमती भागीरथीबाई बसवंतराव मुंडकर यांच्या सन्मानार्थ सत्कार सुह्रदयी व्यक्तींचा अन् सन्मान माईचा या कार्यक्रमा अंतर्गत सोमवार दि.७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता बिलोली येथे सत्यपाल महाराजांची सत्यवाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
    बिलोली शहरातील देगलुर मार्गावर असलेल्या आठवडी बाजाराच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या  सदर कार्यक्रमात स्वामी रामानंदतिर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरू उद्धव भोसले,नांदेड जिल्हा पोलिस अधिक्षक संजय जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात येऊन सन्मान माईचा अंतर्गत श्रीमती भागिरथीबाई बसवंतराव मुंडकर व सर्व मातांच्या प्रातिनिधीक सन्मानार्थ सप्तखंजेरी वादक,राष्ट्रीय प्रबोधनात्मक किर्तनकार सत्यपाल महाराज यांच्या सत्यवाणीचे आयोजन करण्यात आले आहे.तरी बिलोली शहर व परिसरात नागरिकांनी सत्कार सुह्रदयी व्यक्तींचा अन् सन्मान माई चा या कार्यक्रमा अंतर्गत आयोजित सत्यपाल महाराजांच्या सत्यवाणी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे अवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


1 टिप्पणी:

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...