बिलोली बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त "युवा पँथर संघटना बिलोली" च्या वतीने 'एक वही एक पेन उपक्रम ' राबविण्यात आला.
बिलोली येथील "सत्य साईबाबा प्राथमिक विद्यालय बिलोली" या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना 'वही व पेन' वाटप करण्यात आले. "देशाला महासत्ता बनवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या विचारावर चालणे गरजेचे आहे." असा संदेश कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व युवा पँथर संघटना बिलोली तालुकाध्यक्ष अरूणकुमार सुर्यवंशी कोळगावकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांची मने जिंकली.सम्यक सुर्यवंशी या विद्यार्थ्यांस भाषणासाठी रोख रक्कम बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संदीप गायकवाड हे होते. तर युवा पँथर संघटनेचे हर्षवर्धन कांबळे,विकास डुमणे,अतुल कांबळे,किशन डुमणे,कामाजी डुमणे, संभाजी ब्रिगेड चे जिल्हाउपाध्यक्ष टेकाळे, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष कदम, जय मल्हार सेना तालुकाध्यक्ष मैलारे आवर्जुन उपस्थित होते.पिंपळगाव येथील 'संत कबीर विद्यालय पिंपळगाव व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव येथे देखील संघटने तर्क वही पेन वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बांधवांनी मेहनत घेतली.
जबरदस्त कार्यक्रम आयोजित केला
उत्तर द्याहटवा*युवा पँथर तर्फे विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करून महामानवास अभिवादन*
https://24newsnandedcom.blogspot.com/2018/12/blog-post_66.html