०७ डिसेंबर २०१८

न्यायालय निर्णयाचा सर्वानी आदर करावा:मौलाना अहेमद बेग

काळा दिवस पाळत मुस्लीम समाजा कडुन तहसिलदाराला निवेदन

 ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मस्जीद पाडल्या प्रकरणी शहरासह तालुक्यातील मुस्लीम समाजा कडुन आपआपले व्यवहार बंद ठेवुन तहसिल समोर सर्व समाज एकत्र येवुन काळा दिवस पाळला व आपल्या भावना तहसिलदाराला निवेदना मार्फत दिले. यावेळी मौलाना अहेमद बेग यांनी आपले मत व्यक्त करतांना सांगितले की देशाचा हितासाठी सर्वानी न्यायलयचा निर्णयाचा  सर्वानी आदर करावे.

६ डिसेंबर रोजी बाबरी मस्जीद पाड़ून २६ वर्षे उलटले आहेत.त्यांचा निर्णय हे न्यायलयात प्रलंबित आहे.आज दि.६ डिसेंबर चा अनुशांघाने बिलोली
 तालुक्यातील मुस्लीम समाज आजचा दिवस हे काळा दिवस पाळत  व आपली प्रतिष्ठाने बंद ठेवुन काळा दिवस पाळला काळ्या फिती खिशाला लावुन निषेध व्यक्त केला तात्कालीन काँग्रेस सरकारवर व भाजपाच्या नेत्यावर सडकुन टीका केली यावेळी  मौलाना अहेमद बेग यांनी देशाचा हितासाठी न्यायलाचा  निर्णय सर्वानी  मान्य करावा यावेळी  मौलाना मुबिन खान यांनी म्हणाले यावेळी शहर व तालूक्यातील मुस्लिम  बांधव मोठ्या   संखेने   उपस्थित होते यावेळी  पोलिस निरिक्षक भगवान धबडगे मोठा बंदोबस्त ठेवला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...