रामतिर्थ
आज सर्वाकडे मोबाईल झाले आहे. त्या मुळे यूवा वर्ग , मोबाइल, टि.व्ही , इंटरनेट , फेसबुक , वाँटसब याचा जास्त वापर करत आहे त्या मुळे खेळ व क्रिडा या कडे युवा वर्ग दुर्लक्ष करत असल्याचे दिसुन येत आहे या मुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी ग्रामीण व शहरी भागातील युवकांना कला व क्रिडा मध्ये संधी मिळावी या हेतुने या भव्य महोत्सवाचे आयोजन युवा मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आले भाजपचे विधानसभा सदस्य आमदार राम पाटील रातोळीकर यांनी शंकरनगर तालुका बिलोली येथे आयोजित करण्यात आलेल्या सिएम.चुशक क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी उदघाटक म्हणून बोलताना व्यक्त केले.
बिलोली- देगलुर विधानसभा मतदारसंघातील शंकरनगर येथे देशातील सर्वात मोठ्या सिएम चुषक क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन भाजपचे आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी भाजप युवामोर्चाचे जिल्हा अध्यक्ष रवि पाटील खतगावकर, प्रदेश सचिव आरुन पाठक , जिल्हा सी.एम चषक अँड . रावसाहेब देशमुख , आरुनजी सुकळकर , नागनाथ पाटील , गणेश पाटील,आंनद पाटील बिराजदार, शिवकुमार देवाडे , आत्माराम पाटील, शांतेश्वर पाटील , नागनाथ पाटील, माधव सुर्यतळे, बालाजी पाटील दुगावकर, संतोष पुय्यड आदिसह अन्य मान्यवर मंडळी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी खेळाडूना मार्गदर्शन करताना भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष रवि पाटील खतगावकर यांनी पुढे बोलताना म्हणाले की आमचा पक्ष हा नुसत्या खेळापुरता नसुन पक्षाच्या विविध योजना या व अशा माध्यमातून सामान्य माणसाच्या कुटंबा पर्यंत पोहोचली पाहीजे हा आमचा या मागचा उदेश असल्याचे सांगत लोहा नगरपालिकेच्या निवडणुकित तुमच्या सारख्या युवकांची फळी भाजप कडे जोडल्या जात असल्यानेच मोठा विजय झाल्याचे सांगितले.
सिएम चुषक क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ करताना हि स्पर्धा देगलुर येथील श्री क्रिकेट क्लब व गुलजार क्रिकेट टिम यांच्यात खेळण्यात आला असता या स्पर्धेत श्री क्रिकेट क्लब देगलुर या टिमचा विजय झाला. या कार्यक्रमासाठी युवा तालूका अध्यक्ष इंद्रजीत तुडमे , निलेश देशमुख, सय्यद रियाज, प्रतीक अंकुशकर, बळवंत पाटील , राजू गादगे, गणेश पाटील अदिनी परिश्रम घेतले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा