बिलोली(प्रतिनिधी)मराठी पत्रकार परिषद सलग्न बिलोली तालुका मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी दादाराव इंगळे तर सरचिटणीस पदी गणेश कत्रुवार व कार्याध्यक्षपदी रत्नाकर जाधव यांची वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्तिथीत निवड करण्यात आली.प्रारंभी पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनी प्रास्ताविकच्या माध्यमातुन पत्रकार संघाच्या कामाचा आढावा दिला या बैठकीला तालुक्यातील विविध भागातुन पत्रकाराची उपस्थिती लाभली.मराठी पत्रकार परिषद संलग्न बिलोली तालुका मराठी पत्रकार संघाची कार्यकारणीची निवड राज्य कार्यकारणी सदस्य प्रकाशभाऊ कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली,तर जिल्हाध्यक्ष प्रदीप नागापूरकर व जिल्हा सरचिटणीस सुभाष लोणे यांच्या उपस्तिथीत करण्यात आली.परिषदेच्या नियमावली प्रमाणे बिलोली तालुकाध्यक्षपदी दादाराव इंगळे तर कार्याध्यक्षपदी रत्नाकर जाधव यांची तर सरचिटणीस पदी गणेश कत्रुवार यांची निवड करण्यात आली.संघाच्या उपाध्यक्षपदी माधव एडके,संदीप गायकवाड, सह सचिव पदी हरीश देशपांडे,कोषाध्यक्षपदी शे.सुलेमान,तालुका संघटक म्हणून अशोक दगडे,प्रसिद्धी प्रमुख म्हणून जयवर्धन भोसीकर तर कार्यकारणी सदस्य अँन्ड बाबुराव देशमुख,सिद्धार्थ कांबळे,संतोष चव्हाण,कुणाल पवारे,भास्कर भेदेकर,व्यंकट शिनगारे यांची निवड करण्यात आली.तर सल्लागारपदी गोविंद मुंडकर, प्रकाश पोवाडे,विठ्ठल चंदनकर,एन.जी.वाघमोडे,प्रा. शंकर पवार, गिरीष देशपांडे,विजय होपळे,यांची निवड करण्यात आली.उपस्थित पदाधिका-यानी नव्या अध्यक्षाकडे कार्य सुपुर्द करण्यात येवुन नव्या कार्यकारिनीचे अभिनंदन करण्यात आले.यावेळी जेष्ट पत्रकार प्रा.शंकर पवार,विठ्ठल चंदनकर,प्रकाश पोवाडे,अशोक दगडे,मावळते ता.अ.तथा जिल्हा सहसचिव राजेंद्र कांबळे,जिल्हा कार्यकारिनी सदस्य हर्ष कुंडलवाडीकर,कल्यान गायकवाड,व नवनिर्वाचित सर्व कार्यकारिनी पदाधिकारी, तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
बातम्या
सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे
नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...

-
सहाय्यक संचालक (हिवताप) लातूर यांना संघटनेचे निवेदन सादर नांदेड :- लातूर विभागीय सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप) लातूर पदी डॉ.हणमंत ड...
-
नांदेड :- महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेतर्फे दि. 29 जून 2025 (रविवार) रोजी शुभारंभ मंगल कार्यालय, लेबर कॉलनी नांदेड येथे 200...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा