मोठ बनायचं असेल तर शिक्षणाला पर्याय नाही.असे मत मिरज येथील शेठ रतिलाल विठ्ठलदास गोसलिया ज्युनिअर काॅलेज ऑफ एज्युकेशन प्राचार्य गौतम शिंगे यांनी व्यक्त केले.
पांडोझरी (ता जत) येथील बाबरवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शिंगे गौतम होते स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक दिलीप वाघमारे यांनी केले . सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन केले .पुलवामा येथील शहिद झालेल्या केंद्रिय राखीव सीमा दल(सी.आर.पी.एफ)जवानानां श्रद्धांजली वाहण्यात आली. शाळेची माजी विद्यार्थीनी शालू गडदे हिने देशभक्ती गीत सादर कार्यक्रमासाठी अधिव्याख्याता प्रा उत्तम पांढरे, अधिव्याख्याता प्रा विकास माने विशाल खाडे यांनी मार्गदर्शन केले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ सविता मोटे यांनी सुद्धा शाळेच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त केला.
कार्यक्रमासत्कार प्रा उत्तम पांढरे, प्रा विकास माने,दिलीप वाघमारे, आप्पासो गडदे, सविता मोटे, विशाल खाडे ,शोभा बाबर ,कृष्णा मोटे, राजू गडदे मिस्त्री , तुकाराम बाबर,शिवाजी बाबर,जानकर,दिलीप बाबर,शालू गडदे, रामाण्णा सन्नाळे उपस्थित होते .आभार एस. बी मोटे यांनी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा