बिलोली - सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाअंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी )पुणे च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात राजर्षी शाहू महाराज जयंती सप्ताह २० जून ते २६ जून पर्यंत साजरा होत आहे .
सविस्तर वृत्त असे कि,बार्टी पुणे च्या वतीने राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त निबंध स्पर्धा , भाषण स्पर्धा , तसेच प्रबोधन कार्यक्रम घेण्यात येत आहे .त्या निमित्ताने बिलोली तालुका समतादूत शेख इर्शाद मौलना यांनी तालुक्यातील लोहगाव ,तळणी ,दगडापूर ,कोल्हेबोरगाव या गावातील शाळेत निबंध स्पर्धा ,भाषण स्पर्धा व प्रबोधन कार्यक्रम घेत आहेत .तसेच २६ जून पर्यंत विविध शाळेला भेट देऊन कार्यक्रमाचे नियोजन केले जात आहे .व राजर्षी शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य ,सामाजिक कार्य व जीवन परिचय या विषयावर प्रबोधन केले जात आहे .समतादूत शेख आय.एम.यांनी कोल्हेबोरगाव येथील भास्कर प्राथमिक शाळा येथे प्रबोधन करताना सांगितले कि. आपल्या शिक्षणातून आणि तसेच्या अभ्यासक्रमातून महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रचारित व प्रसारित होत असतात. या थोर महापुरुषांचे सामजिक, राजकीय आणि सांस्कृतिक स्वरूपातील विचार आपल्याला प्रेरित व प्रोत्साहित करीत असतात. त्याचे विचार २१ व्या शतकात आपल्या विदयार्थी वर्गाला नव्याने देणे आवश्यक आहे.
शिक्षण हा जीवनाचा आधार आहे. शिक्षणापासून आपण आपणास वेगळे करू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती हा शिक्षण देणारा एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे. केवळ त्याच्याकडून आपण काय घ्यावे हे आपणास कळायला पाहिजे. शिक्षण ही जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे. जीवन म्हणजे काय? जीवन का जगावे, जीवन कसे जगावे, जीवनाची सार्थकता कशामध्ये आहे, जीवन पूर्ण कसे करावे. आपण जीवनातून काय घ्यावे व इतरांना काय दयावे. या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे शिक्षण होय. म्हणूनच 'शिक्षणानेच सर्व काही होत आहे, त्याकरिता आधी शिक्षण घेतलेच पाहिजे'
जीवन शिक्षण ही काळाची गरज बनली आहे आणि आपल्या सर्व थोर शिक्षणतज्ज्ञांनी, विचारवंतांनी, समाजसुधारकांनी जीवन शिक्षणाची धुरा सांभाळली आहे आणि सर्वांना जगण्याची एक दशा आणि दिशा देण्याची महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. २१व्या शतकामध्ये शिक्षण घेणारा समुदाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पण त्यातून जीवनविषयक शिक्षण मिळत आहे काय? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. तेव्हा आपल्या शिक्षणतज्ज्ञांचे आजच्या शिक्षणातून व अभ्यासक्रमातून प्रकट होणारे विचार निश्चितच येणा-या भविष्यकालीन समस्यांचे निराकरण व उत्तम जीवन जगण्यासाठी दिशादर्शक ठरतील. यामध्ये प्रामुख्याने महात्मा फुले, राजर्षी शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मार्गदर्शनपर आहेत. शिक्षण आणि अभ्यासक्रमामध्ये जे विचार आहेत. ते याच थोरांचे आहेत.
तसेच शेख आय.एम.यांनी शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य स्पष्ट करताना सांगितले कि,
राजर्षी शाहू महाराजांनी जे शैक्षणिक क्षेत्रात कार्य केले त्या हिताच्या दृष्टीने अलौकिक कार्य केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने १) विदयार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण उपलब्ध करून दिले. २) शिष्यवृत्तीची सवलत देण्यावर भर देण्यात आला. ३) विदयार्थ्यांसाठी वसतिगृहाची व्यवस्था करण्यात यावी. ४) विदयार्थ्यांना विविध सोयी सवलती देणे. आपल्या शिक्षणातून आणि तसेच अभ्यासक्रमातून म. फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब यांचे विचार प्रचारित व प्रसारित होत असतात. या थोर महापुरुषांचे सामजिक, राजकीय आणि सांस्कृतिक स्वरूपातील विचार आपल्याला प्रेरित व प्रोत्साहित करीत असतात. त्याचे विचार २१ व्या शतकात आपल्या विदयार्थी वर्गाला नव्याने देणे आवश्यक आहे. कारण आपली पिढी भरकटत चालली तेव्हा त्यांना या महामानवाचे आदर्श डोळ्यासमोर ठेवता येईल.
छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकीय स्तरावर असामान्य कार्य करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तर त्यांचाच वारसा चालविणारे छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक स्तरावर असामान्य कार्य करून सक्तीचे प्राथमिक शिक्षण, अस्पृश्य निवारण, आंतरजातीय विवाह, विधवा पुनर्विवाह, अस्पृश्यांना स्वयंरोजगार, बहुजनांसाठी वसतिगृह यासंबंधी सक्तीचे कायदे करून समाजाला विकासाची नवीन दिशा देण्याचे कार्य केले .
सदर कार्यक्रम करण्यासाठी बार्टी चे महासंचालक मा.कैलास खणसे व बार्टी च्या मुख्य प्रकल्प संचालिका मा.प्रज्ञा वाघमारे व नांदेड जिल्हा प्रकल्प अधिकारी तथा सहा.प्रकल्प संचालिका सौ.सुजाता पोहरे यांनी मार्गदर्शन करत आहेत .तसेच सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे सहशिक्षक जे.डी.येरकलवाड ,व्ही.यु .मक्कापल्ले ,एम.व्ही.मानेमोड ,पी.सी.बोरगावकर यांनी परिश्रम घेतले व शाळेच्या मु.अ. जी.एस.डुमणवाड यांनी आभार मानले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा