२५ जुलै २०१९

कृषी तंत्र विद्यालय येथे वृक्षारोपण




महाराष्ट्र शासनाकडून दि.१५ जून ते ३० सप्टेंबर हा काळ वनमहोत्सव म्हणून साजरा केला जातो त्याच अनुषंगाने समतादूत वृक्षारोपण सप्ताह साजरा करण्यात येत आहे .महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाअंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या बिलोली तालुका समतादूत शेख इर्शाद मौलाना यांनी बिलोली तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण केले आहे .त्यामध्ये शासकीय वसतिगृह ,महाविद्यालय ,स्मशानभूमी ,प्राथमिक आरोग्य केंद्र ,प्रा.शाळा ,ग्रामपंचायत कार्यालय परिसर इ.ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले .
बिलोली तालुक्यातील पाचपिंपळी येथे रावसाहेब पाटील कृषी तंत्र विद्यालय येथे वृक्षरपोण सप्ताह निमित्त शेख आय.एम.यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि, दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असून मोठय़ा प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, जंगलांचा नाश या बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत. पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित व अपूर्ण पर्जन्यमान, भयानक उष्णता अशा संकटांना तोंड देणे भाग पडत आहे. यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास काळाची गरज ओळखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन तालुका समतादूत  शेख आय.एम केले आहे वनसंपदेवर मानवाची बरीचशी कामे अवलंबून असून वृक्षांचे रोपण व संवर्धन होणे महत्त्वाचे आहे.  राष्ट्रीय कर्तव्य म्हणून या मोहिमेत सहभागी व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
  शासकीय पातळीवर जंगलाखाली असणारे भूक्षेत्र वाढावे या साठी मोठ्या पातळीवर वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेतले जातात. पूर्वी या वृक्षारोपण कार्यक्रमामुळे सुबाभूळ, गुलमोहोर, निलगिरी अशी परदेशी झाडे भारतात लावली गेली. या झाडांची आपल्या स्थानिक पक्ष्यांना सवय नसल्याने या झाडांचा अथवा या झाडांची पाने फुले फळे यांचा वापर भारतीय पक्षी करत नाहीत. कालांतराने शासकीय यंत्रणेला या वृक्षारोपण कार्यक्रमातील त्रुटी लक्षात आल्या. सध्या भारतातील स्थानिक प्रजातींची लागवड करण्याकडे सर्व शासकीय यंत्रणा तसेच गैर सरकारी संस्थांचा कल आहे वृक्षारोपण करून प्रत्येकाने वृक्षाची जोपासना करणे ही काळाची गरज आहे. वृक्ष नसतील तर पावसाबरोबरच अनेक समस्या उद्भवतील . गेल्या काही वर्षात वृक्षतोड मोठया प्रमाणात झाल्याने त्याचा विपरीत परिणाम जनसामान्यांवर, येथील वातावरणावर झालेला दिसून येत आहे .झाडे लावल्याने भविष्यात पाऊस पडेल असा संदेश पावसा ये घरोघरी, झाडे लावा घरोघरी यातून देण्यात आला. या वेळी शेख आय.एम म्हणाले कि, वृक्ष आपले सखेसोबती आहेत. आज मोठया प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने जमिनीची धूप होत आहे. अवेळी पावसाचे आगमन वातावरणातील प्राणवायू संपुष्टात येत आहे. भविष्यात अशीच परिस्थिती राहिल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. प्रत्येकाने वृक्षारोपण करणे ही काळाची गरज बनली आहे. ही गरज ओळखून रोपाची लागवड करून त्याचे संगोपन केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावेळी या कार्यक्रमाला कृषी तंत्र विद्यालयाचे  प्राचार्य एस.डी.पवार ,व कृषी पर्यवेक्षक एम.एस.शिंदे ,के.वाय .सय्यद ,ए.आर.वानखेडे व इतर कर्मचारी उपस्थित होते .
सदरचे कार्यक्रम बार्टीचे महासंचालक मा.कैलास कणसे,आयुक्त मा.शंभरकर ,मुख्य प्रकल्प संचालिका डॉ.प्रज्ञा वाघमारे ,व नांदेड जिल्हा प्रकल्प अधिकारी तथा सहा.प्रकल्प संचालिका मा.सौ.सुजाता पोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...