बिलोली -(ता.बिलोली)
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाअंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या वतीने बिलोली तालुका समतादूत शेख इर्शाद मौलाना यांनी १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिनानिमित्त) भारतीय संविधानाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत ला भेट दिले व स्वातंत्र्य दिन या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
सविस्तर वृत्त असे कि, ग्रामपंचायत सावळी येथे सकाळी ०८ वाजून ०५ मिनिटांनी सरपंच मा.नागनाथ पाटील सावळीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.व नंतर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले व ह्याचबरोबर मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले तालुका समतादूत शेख आय.एम.यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रबोधन व मार्गदर्शन कार्यक्रमाची सुरुवात केली , .सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी तसेच सामाजिक कार्यकर्ता पठाण जावेद खान ,पठाण जाफर खान ,शेख एखार व ग्रामपंचायत सदस्य सय्यद महेमूद ,राहुल व शेख खलील व माजी सरपंच शेख जानिमियाँ , उपसरपंच राजेश कंदमवार माजी सरपंच गंगाधर आरसे यांनी परिश्रम घेतले .सदर कार्यक्रम करण्यासाठी बार्टी चे महासंचालक मा.कैलास कणसे व मुख्य प्रकल्प संचालिका (समतादूत) मा.प्रज्ञा वाघमारे तसेच सहा.प्रकल्प संचालिका तथा नांदेड जिल्हा प्रकल्प अधिकारी सौ.सुजाता पोहरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा