१४ ऑगस्ट २०१९

सगरोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निकृष्ठ कामाची चौकशी करण्याची शंकर महाजन याची मागणी

  ‌‌.         

बिलोली    गेल्या ३८ वर्षा पूर्वी प्रकाश खेडकर यांनी दगड सिमेंट यांचा वापर .करून भिंतीवर छत टाकण्यात आले होते त्याला आज बराच कालावधी लोटला असून भिंतीना जागोजागी  तडे गेले आहेत तर आतुन गिलावा करण्यात आलेले प्लस्टर गळुन खाली पडत असल्यामुळे प्राथमीक अरोग्य केंद्राच्या भिंती व धत बोलु लागले असुन ते आज अक्शिजन वर असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत  असताना चौदाव्या वित्त आयोगातुन तिन लक्ष रुपयाचे निधी ग्रामपंचायत सगरोळी कडुन एका गुत्तेदास देण्यात आले असून ते अत्यंत निकृष्ठ प्रतीचे काम करण्यात आले आहे छतावर फक्त बारिक गिट्टी सिमेंट टाकुन  क्विंरीग करण्यात आल्यामुळे  प्राथमीक अरोग्य केंद्राच्या छतास पून्हा गळती लागली असुन संपूर्ण दवाखान्यात पाणीच पाणी झाले आहे आपरेशन थेटर, रुग्णाचे बेड, औषध साठा रुम, भिजवून ओलेचिंब झाले असून दवाखान्यात कमालीची शांतता पसरली आहे असुन दारे , खिडक्या मोडकळीस आले असून थातुरमातुर काम करण्यात आलेल्या निकृष्ठ  कामाची चौकशी करण्यात येऊन संबंधीत गुत्तेदारावर योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसे ता.अध्यक्ष शंकर महाजन तथा माचापुरे नागेश तालुकाध्यक्ष टायगर ग्रुप, देवा जमदाडे लवटे शिवाजी, बोडके अर्जुन,चावरे माधव, बोडके बळीराम,पद्मवार रमेश,पवारे योगाजी,पवारे संग्राम आदींनी एका निवेदनाद्वारे मुख्यकार्यकारी अधीकारी  जि.प.नांदेड,तथा गट विकास अधिकारी पंचायत समिती बिलोली यांच्या कडे निकृष्ठ कामाची चौकशी मागणीकेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...