जागृत महाराष्ट्र न्युज चॅनलच्या वतीने आयोजीत गुणवंत विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा संपन्न.
मुखेड ता.प्रतिनिधी
73 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचे ओचीत्य साधून
जागृत महाराष्ट्र न्युज चॅनलच्या वतीने महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.त्याअनुशंगाने
नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे दि.15 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वा.हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाची सुरुवात महारुषांच्या प्रतिमांना दीप प्रज्वलन ध पुष्पपुजानाने करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.प्रा.उत्तमकुमार कांबळे
(भारीप जिल्हाध्यक्ष नांदेड) हे होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलीस उपनिरीक्षक मा.असद शेख व डाॅ.राहुल कांबळे हे होते.
या कार्यक्रमा वेळी मा.प्रा.उत्तमकुमार कांबळे यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.तसेच कार्यक्रमाचे आयोजक तथा जागृत महाराष्ट्र न्युज चॅनलचे मुखेड तालुका प्रतिनिधी भारत सोनकांबळे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थांनी ध्येय निश्चित करुन अध्यायन केल्यास जीवनात यश मिळाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन केले. मुखेड तालुक्यातील बेरळी येथील यशवंतराव चव्हाण हायस्कुल चे गुणवंत विद्यार्थी - सचीन माने व पुजा उलगुलवाड, क्रांती पाटील, बेटमोगरा येथील जि.प.हा.शाळेचे
मनीषा देशमुख व स्वप्नाली पाटील व कै.बळीरामजी पाटील ज्युनिअर काॅलेजची कु.शितल बाबुराव कांबळे
या गुणवंत विद्यार्थयांचा जागृत महाराष्ट्र न्युज चॅनलच्या वतीने प्रा.उत्तमकुमार कांबळे व जागृत महाराष्ट्र न्युज चॅनलचे मुखेड तालुका प्रतिनिधी पञकार भारत सोनकांबळे यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाला पञकार दत्तात्रय कांबळे, सचीन माने, डाॅ.राहुल कांबळे, रियाज शेख, मोतीपाशा पाळेकर, कृष्णा पाटील तांदळीकर, पञकार मुस्तफा पिंजारी, श्रीराम पिटलेवाड, नारायन शिंदे, ज्ञानेश्वर येलूलवाड, सुर्यकांत कांबळे जांभळीकर, गवाले, बबलू शेख,दिपक सोनकांबळे, दिलीप सोनकांबळे, आदीसह पालक, शिक्षक, महीला, विद्यार्थी व विद्यार्थीनीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सुञसंचलन ज्ञानेश्वर येलूलवाड यांनी केले तर आभार जागृत महाराष्ट्र न्युज चॅनलचे मुखेड तालुका प्रतिनिधी भारत सोनकांबळे यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा