पद्यश्री डाँ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परीषदेतर्फे दरवर्षी शेती क्षेत्राशी निगडीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सहकार महर्षी पद्मश्री डाँ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी पुरस्कार देऊन गौरविण्यात येतो.त्या अनुशंगान्वे यंदाच्या कृषी पञकार पुरस्कारासाठी राजु पाटील शिंदे याची निवड करण्यात आल्याचे जाहिर करण्यात आले आसुन सदर पुरस्कार वितरण सोहळा नांदेड येथे २५ आँगस्ट रोजी अनेक मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होणार आहे.
सहकार महर्षी पद्मश्री डाँ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जंयती व शेतकरी दिनानिमित २५ आँगस्ट रोजी कुसुम सभागृह नांदेड येथे आयोजित शेतकरी मार्गदर्शन मेळाव्यात शेतीमध्ये नवनविन प्रयोग राबवुनअधुनिक पध्दतीने शेती करणाऱ्या जिल्ह्यातील
शेतक-यांचा कृषी विषयक शासनाच्या योजनेचा शेतक-यांना लाभ मिळुन देणाऱ्या कृषीअधिकारी ,कृषिसहायक व शेती विषयक वृतांकन करणारे पञकार ,तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे सामाजिक कार्यकर्ते व पदाधिका-यांना सदर पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. त्या नुसार पञकार पुरस्कारासाठी बिलोलीचे पञकार राजु पाटील शिंदे शिंपाळकर यांची निवड करण्यात आल्याचे निवड समितीच्या वतिने जाहिर करण्यात आले आसुन हा पुरस्कार वितरण सोहळा २५ आँगस्ट रोजी नांदेड येथे कुसुम सभागृहात गृहनिर्माण मंञी राधाकृष्ण विखे पाटील ,कृषीमंञी डाँ. अनिल बोंडे कृषी व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले मराठवाडा कृषी विद्यापीठ कुलगुरु डाँ .अशोक ढवण खा.प्रताप पाटील चिखलीकर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित पुरस्काराचे वितरण होणार आसल्याचे कार्यक्रमाचे आयोजक तथा पद्मश्री डाँ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे कार्याध्यक्ष भागवत देवसकर यानी एका प्रसिद्धी पञकाद्वारे जाहीर केले. या पुर्वी त्यांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र रत्न , बिहार हिंदी विद्यापीठाच्या वतिने पञकार शिरोमणि, महात्मा कबीर समता परीषदेतर्फे नांदेड रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा