नायगाव -मागच्या आठ वर्षापासून नायगांव शहर, तालुका व जिल्हा पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यकर्ता ते युवक शाखेचा जिल्हा प्रवक्ता म्हणून प्रस्थापित राजकीय शक्ती विरोधात कार्य केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव नायगांव शहर व तालुक्यात जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी तमळीने काम केले...पक्षाच्या सामाजीक, राजकीय, शैक्षणिक व शेतकरी हिताच्या आंदोलनाची जबाबदारी घेउन सहभागी होऊन आंदोलने यशस्वी केली. तसेच नायगांच्या जनतेच्या हितासाठी तत्कालीन ग्रामपंचायत व नगरपंचायत समोर उपोषण व धरणे कार्यक्रम केले. शहरातील नागरिक, स्नेही व मिञ व गोरगरीबांचे प्रश्न सोडवण्याचे कार्य केले. राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार साहेब, अजीतदादा पवार, जयंत पाटील, सुप्रियाताई, उमेशदादा पाटील, गंगाधररावजी कुंटूरकर, बापूसाहेब गोरठेकर, शंकर अण्णा धोंडगे, राजेश कुंटूरकर, मारोतराव कवळे गुरुजी, विनायकराव कुलकर्णी, विश्वनाथराव बन्नाळीकर, वसंत सुगावे, फेरोजलाला,रऊफ जमीनदार, दासराव पुय्यड, भास्करदादा भिलवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने पक्षाचे इमानदारीने कार्य केले व पक्ष वाढवला...नायगांव नगरपंचायत निवडणुकीत नगरसेवक निवडून आणण्यासाठी मेहनत घेतली त्यामुळे चार नगरसेवक निवडून आले...परंतु आता पुढील वाटचालीसाठी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला कारण ज्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमधे आले होते बापूसाहेब गोरठेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली म्हणून चव्हाण यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला... काही दिवसातच दुसर्या राष्ट्रीय पक्षात प्रवेश करणार आहे असे मराठी लाईव्ह न्यूज शी बोलतांना सांगीतले
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
बातम्या
सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे
नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...

-
सहाय्यक संचालक (हिवताप) लातूर यांना संघटनेचे निवेदन सादर नांदेड :- लातूर विभागीय सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप) लातूर पदी डॉ.हणमंत ड...
-
नांदेड :- महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेतर्फे दि. 29 जून 2025 (रविवार) रोजी शुभारंभ मंगल कार्यालय, लेबर कॉलनी नांदेड येथे 200...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा