नायगांव ता.प्रतिनिधी - प्रल्हाद भंडारे
जस जसे आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे जवळ येतांना दिसत असून विविध कार्यक्रम व उपक्रम राबून जनतेचे मने आपल्या कडेच आकर्षीत करताना भाजपा नेत्याची नायगांव मतदार संघात चढाओढ लागलेली दिसत आहे. माञ या स्थानिक नेत्यांच्या चढाओढ आमदार म्हणून बालाजी बच्चेवारची गाडी धावेल आशी चर्चा माञ सुज्ञ नागरिकातून ऐकावयास दिसत आहे.
खरे पाहिले तर नायगांव मतदार संघात. लोकनेते दिवंगत बळवंतराव चव्हाण, माजी मंत्री गंगाधरराव कुंटूरकर, माजी खा भास्करराव पा खतगांवकर या तिन नेत्यशिवाय चौथा नेता आपलीमान वर काढण्यास पुढे येत नव्हता. आलटून पालटून वरील तिन नेत्याकडेच सतेचेसुञ असायचे पण.. उशिराका होईना बालाजी बच्चेवार यांनी नायगांव मतदार संघात भाजपाचे कमळ वाढविण्यासाठी कंबर कसून धाडस केली. राजकिय वारसा नसतानाही . राजकिय नेत्याच्या कोणत्याही दबावाला न भिता निर्भिड पणे पक्षासाठी काम केले तेव्हा कुठेतरी हळू हळू लोक वरील तिन नेत्याची मक्तेदारी मोडीत बच्चेवार यांच्या सोबत जोडले जाऊ लागले. नायगांव हा तालुका व्हावा म्हणून बच्चेवार यांनी संघर्ष केला व जेलही भोगले. बच्चेवार याचं राजकिय वादळ बड्या नेत्यांच्या वाड्याला सुंरूग लागणारं दिसत असल्यामुळे व जनतेचा वाढता कोलही बच्चेवारकडे वळत असल्याने हे त्याच्या चांगलेच लक्षात आले. विद्यमान आमदार वसंतराव चव्हाण यांचे बंधू हानमंतराव चव्हाण यांचा जि. प. निवडणुकीत त्यांचा पराभव करून आपल्यासह पक्षाची मान नायगांवात उंचावून दाखविली. तेव्हा भाजपाचे वरिष्ठ नेत्यानीही बच्चेवार यांची दाखल घेतली. रावसाहेब पा. मोरे टाकळीकर हे जि. प. अध्यक्ष भूषवूनही त्यांच्या बरबडा मतदार संघात पराभवाला सामोरे जावे लागले.
बालाजी बच्चेवार यांची राजकिय लोकांना चांगलीच धस्की बसली होती. असे असतानाही सद्यास्थितीत भाजप पक्षात प्रवेश करून आमदार पदाचे डोहाळे लागलेले राजकीय नात्यामध्ये आमदार पदाच्या लालसापोटी चढाओढ लागलेली दिसते विविध कार्यक्रम घेऊन लोकांचे मने आपल्या कडेच वळविलेले तर आपण आमदार होऊ शकतो आशी चढाओढ पाहताना जनतेत माञ चवीने चर्चा सुरू आहे.
तुमच्या असुद्या चढाओढी पण आमदार म्हणून बालाजी बच्चेवारची धावेल गाडी असा सुर सुज्ञ नागरिक काढत असताना दिसत आहे..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा