०१ ऑगस्ट २०१९

अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची आज समाजाला गरज बालाजी बच्चेवार



 आज नरसी येथे अण्णाभाऊ साठे यांची 99 वी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली यावेळी बालाजी बच्चेवार बोलत असताना म्हणाले आजही या ठिकाणी आल्यानंतर समाजातली लोक समस्या सांगत होते देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षाचा कालावधी झाला परंतु अजूनही ह्या व्यवस्थेने समाजातल्या समस्यांचं निराकरण केलेलं नाही ह्या जर समस्या सुटायचा असतील आमच्या हातात सत्ता द्या तुमचा समाज मंदिराचा प्रश्न चुटकीसरशी सोडू आपण पाच दहा लाख रुपये काय मागता 25 लाख रुपये या समाज मंदिराच्या उभारणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या खासदाराच्या माध्यमातून येत्या चार महिन्यात देऊ आपण फक्त आमच्या हातात सत्ता द्या असेही बालाजी बच्चेवार मिश्किलपणे म्हणाले आपण जे देण्यास तयार आहे त्याला मागत नाही जो देण्यास तयार नाही त्यांच्याकडून आपण अपेक्षा करता अशी कोपरखळीही विद्यमान आमदाराचे नाव न घेता बालाजी बच्चेवार यांनी केली यावर एकच हशा पिकला व्यासपीठावर विद्यमान आमदार वसंतराव चव्हाण शिवराज पाटील होटाळकर माणिकराव लोहगावे मांजरम जिल्हा परिषदेच्या सदस्य सौ पुनम ताई पवार एपीआय शिंदे साहेब आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक भगवानराव पाटील  भिलवडे हे उपस्थित होते बालाजी बच्चेवार पुढे बोलताना म्हणाले राज्याचे नेते तथा मुख्यमंत्री हे शेवटच्या घटकापर्यंत या लोकांचा विकास झाला पाहिजे त्यांचं जीवनमान उंचावण्याच्या दृष्टिकोनातून काम करत असल्याचे बालाजी बच्चेवार यांनी सांगितले यावेळी अनेक मान्यवरांचीही भाषणे झाली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...