१७ सप्टेंबर २०१९

गोरगरीबांच्या हिताची कामे करण्यासाठी बालाजी बच्चेवार यांचे हात बळकट करा - शिवाजी पाटील वडजे



 नायगाव-  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नायगाव येथे आयोजित चाय पे चर्चा या कार्यक्रमात  नायगाव  येथील उद्योजक शिवाजी पाटील वडजे यांनी आपले मनोगत मांडले. यावेळी व्यासपीठावर नायगाव विधानसभा मतदार संघाचे नेते बालाजी बच्चेवार भाजपा तालुकाध्यक्ष धनराज शिरोळे जिल्हा चिटणीस अवकाश पाटील धुपेकर तालुका सरचिटणीस व्यंकट पाटील चव्हाण अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष शेखवल्ली मेहतफ भाई विस्तारक सुरेश मोरे गजानन चव्हाण चव्हाण आदी कार्यकर्ते सहभागी होते. पुढे बोलताना शिवाजी पाटील वडजे यांनी  या भागातील गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे युवा नेते बालाजी बच्चेवार यांना विधानसभेत पाठवण्याचे आव्हान केले आहे. नायगाव उमरी धर्माबाद  विधानसभा मतदारसंघात विकास कामे खोळंबली असून मूलभूत गरजा रस्त्याची गैरसोय व या भागातील सिंचनाचा प्रश्न स्थानिक आमदारांनी याकडे कानाडोळा करीत या भागाचा विकास खंडित केला आहे, या विकासाला चालना देण्यासाठी बालाजी बच्चेवार यासारखे खंबीर नेतृत्व ची गरज आज त्या भागाला आहे बालाजी बच्चेवार यांनी नायगाव जिल्हा परिषद चव्हाण यांना पराभूत करून नायगाव भागाचा विकास कायापालट केला बरबडा जिल्हा परिषद अध्यक्ष यांना पराभूत करून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या भागाचा विकास केला.. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा या भागात केलेले कार्य त्यामध्ये तालुक्याची निर्मिती असो नरशी बाजारपेठ असो कुंटुर उत्पन्न बाजार समिती याचे खरे जनक बालाजी बच्चेवार हेच आहे त्यांनी युवकांची एक मोठी फळी निर्माण करत या भागात 27 वर्षापासून सतत कार्य करत भाजपचा झेंडा हाती घेऊन लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष मध्ये रूपांतर करण्याचे काम त्यांनी आजपर्यंत चालू ठेवले आहे या भागाचे खरे शिलेदार बालाजी बचेवार असून येणाऱ्या विधानसभेत गोरगरिबांचा शेतकरी कष्टकऱ्यांचा नेता बालाजी बच्चेवार यांचा आवाज घुमला  पाहिजे यासाठी नायगाव उमरी धर्माबाद या मतदारसंघातील जनतेने बालाजी बच्चेवार यांच्या सदैव पाठीमागे राहवे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...