नायगांव बा (सय्यद रियाज)
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते,माजी राज्यमंत्री गंगाधररावजी कुंटूरकर व त्यांचे सुपुत्र राजेश कुंटूरकर व रुपेश कुंटूरकर तसेच,समर्थकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपा युवानेते तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी आपल्या निवासस्थानी नायगांव येथे आज जंगी स्वागत व सत्कार केला.
राज्याचे मुख्यमंञी ना.देवेंद्र फडणविस यांच्या उपस्थितीत आज नरसी येथिल जाहिर सभेत भाजपा प्रवेशित झालेले राष्ट्रवादीचे दिग्गज नेते माजी राज्यमंञी गंगाधररावजी कुंटूरकर यांच्यासह त्यांचे सुपुञ नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे संचालक राजेश कुंटूरकर व कुंटूरचे सरपंच रुपेश कुंटूरकर यांचा भाजपाचे निष्ठावंत तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बालाजी बच्चेवार यांच्या निवासस्थानी स्वागत व सत्कार करण्यांत आला.
याप्रसंगी कुंटूरकर समर्थक मा.जि.प.सदस्य सुर्याजी पा.चाडकर, पांडुरंग गायकवाड,माजी उपसभापती गजानन जुन्ने,बाबासाहेब पा.हंबर्डे, लक्ष्मण पा. सुजलेगांवकर आदींचाही यावेळी सन्मान करण्यांत आला. याप्रसंगी भाजपा युवानेते बालाजी बच्चेवार यांच्यासह भाजपाचे ता.सरचिटणीस व्यंकटराव पा.चव्हाण, शिवाजी पा.वडजे, संजय मोरे,दत्ता पा.मोरे, शंकर वडपञे आदींच्या हस्ते कुंटूरकर पिता-पुञांसह त्यांच्या समर्थकांनी भाजपात प्रवेश केल्याबद्दल त्यांचा स्वागत व सत्कार करण्यांत आला.
महत्वाचे म्हणजे बालाजी बच्चेवार हे भाजपाचे निष्ठावंत युवानेते म्हणून सुपरिचित असून नायगांवचे विद्यमान आमदार व आगामी विधानसभा निवडणूकीतील काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. राज्यभरात दिग्गज राजकारणी म्हणून ओळखल्या जाणारे कुंटूरकर व त्यांच्या समर्थकांचे भाजपा प्रवेशानंतर पहिल्यांदाच नायगांवात आपल्या निवासस्थानी बालाजी बच्चेवार यांनी जंगी स्वागत केल्याने या सत्कार सोहळ्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा