रोहिणी व प्रणीता ठरल्या महाराष्ट्रातील स्टार प्लेअर
कंधार शेख शादुल - औरंगाबाद येथील गारखेडा क्रिडा संकुल येथे नुकत्याच पार पडलेल्या ३९ व्या महाराष्ट्रा स्टेट बॉल बॕडमिंटन चॕम्पियनशीप २०१९-२० मध्ये लातूर जिल्हा संघाने उत्कृष्ट कामगीरी करीत राज्यात दुसरा येण्याचा बहुमान मिळविला.
महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यातील ६५० खेळाडूंनी सहभाग नोंदवलेल्या या चार दिवसीय राज्यस्तरीय स्पर्धेत लातूर जिल्हाच्या मुलींच्या संघाने कोल्हापूर ,अमरावती,नागपूर , गडचिरोली, अकोला, वाशिम, बीड, जळगाव व यजमान औरंगाबाद या सर्व जिल्हा संघांना सरळ सेट मध्ये हरवून ए पुल विजेता होउन सातारा सोबत क्वाटर फायनल मध्ये विजय मिळवले.. सेमी फायनल मध्ये पुणे जिल्हा सोबत उत्कृष्ट खेळ करीत पुणे संघावर ३५-३० व ३५ - २४ असे स्ट्रेट टु सेट मध्ये विजय प्राप्त करीत पुणे महानगर सोबत फायनल मध्ये प्रवेश केला ...
अतिशय अतितटीच्या या रोमहर्षक सामन्यात ३६-३५ व ३५-३३ असा ३ पाँईंटने लातूर संघास द्वितीय स्थानावर रजत पदकाने समाधान मानावे लागले ...
*संघाच्या या विजयात रोहिणी सुर्यवंशी याची पॉवरपॉईंट शुटिंग व प्रणीता परमेश्वर हिच्या उत्कृष्ट डिफेंस ची खेळी मोलाची ठरली
सोबतच वैष्णवी यादव, प्रतिक्षा माळेकरी ( निलंगा )
स्नेहा हांडे, स्नेहा सिद्धार्थ सुर्यवंशी,भुमीका सुर्यवंशी (अहमदपुर )
वैष्णवी विनायक (लातूर )यांनी संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले ..
संघाला जिल्हा सचिव स्टार अॉफ ईंडिया पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू असद शेख यांचे व राष्ट्रीय खेळाडू सुनिल शिंदे सर यांचे प्रशिक्षण* तसेच मनिषा दिलीप व प्रशांत सुरनर यांचे मार्गदर्शन लाभले..
संघाच्या या यशाबद्दल जिल्हा अध्यक्ष संगमेश्वर निला , शिक्षण महर्षि डि.बी.लोहारे सर,डॉ अशोक सांगवीकर, श्री कोत्तापल्ले,चेतन मुंडे,अदनान शेख,अकबर पठाण,अर्शद शेख यांनी सत्कार करून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या ..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा