नांदेड -(सय्यद रियाज ) नांदेड दक्षिण पद्मशाली महिला समाज संघटनेतर्फे नवरात्र दुर्गामाता महोत्सव 2019 निमित्त
दि. 06/10/2019 रोजी रक्तदान शिबिर सौ. वंदना गुरूपवार यांचे राहते घर विकास नगर जुना कौठा नांदेड येथे आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटक सौ.कविताताई नागनाथ गड्डम अध्यक्षा मराठवाडा महिला संघटना, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ चामलवार, श्री सुनिल माचेवाड नायब तहसिलदार नांदेड, पद्मशाली समाज महिला उच्च विद्याविभूषित प्रा.डॉ ललीता कोंपलवार, श्री देशपांडे, डॉ तोंडेवाड श्री गोळवलकर गुरुजी रक्तपेढी हे उपस्थित होते.
प्रास्ताविकात सौ वंदना गुरुपवार यांनी रक्तदान शिबिर आयोजित करण्याबाबतची संकल्पना सांगितली.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री सुनिल माचेवाड यांनी सांगितले की प्रत्येकाने वर्षातून किमान एक वेळेस तरी रक्तदान केले पाहिजे मी स्वतः वर्षातून दोन वेळेस व माझी सौभाग्यवती एक वेळेस रक्तदान आवश्य करतो रक्तदान शिबिर आयोजित केल्या बद्दल सौ वंदना गुरूपवार व गुरूपवार परीवार यांनी छान कार्यक्रम आयोजित केल्या बद्दल अभिनंदन केले.
श्री देशपांडे यांनी रक्तदान जीवनदान आहे. विकास नगर कौठा परीसर येथे प्रथमच नांदेड दक्षिण महिला समाज संघटनेतर्फे रक्तदान शिबिर आयोजित केल्या बद्दल अभिनंदन केले.
उद्धाटक पर बोलताना सौ कविताताई गड्डम म्हणाले की, नांदेड दक्षिण तालूका पद्मशाली समाज संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर बद्दल कौतुक केले. प्रत्येक महिला संघटनेने काही तरी समाज उपयोगी कार्यक्रम घेतले पाहिजे. महिला ह्या आता कोणत्याही क्षेत्रात कमी किंवा मागे राहिल्या नाहीत हे दाखवून दिले पाहिजे असे सांगितले.
सौ वंदना गुरुपवार, गुरूपवार परीवार व दक्षिण तालुका पद्मशाली महिला समाज संघटनेच्या पदाधिकारी यांच्या सुंदर नियोजन व सुसूत्रताबद्ध कार्यक्रमाची सर्वांनी प्रशंसा केली.
यावेळी महिला सौ.चंद्रकला टिप्रेसवार, सौ मामीडवार, सौ.रंजना सत्यजीत टिप्रेसवार ,सौ ताटपल्लेवार मँडम
तसेच वसमतचे सीताराम दादा म्यानेवार, दशरथ मज्जनवार, बोंतावार, मधुकर सोकळवार नांदेड येथील संग्राम निलपत्रेवार, उमेश कोकुलवार, सत्यजीत टिप्रेसवार, धनजंय गुम्मलवार, मनोहर कोकुलवार, बजरंग नागलवार, नंदु गाजुलवार, भारत राखेवार,अक्षय सुरकुटवार, अजय चौधरी, व्यंकट चिलवरवार, गणेश गड्डम, गजानन वासमवार, गंगा वंगलवार, संजय टिप्रेसवार,गणेश कोकुलवार, दत्ता कोंपलवार, गणेश यल्लेवार, भुमाजी मामीडवार,
सुभाष टाक, चौधरी,भाले सर, ईबितवार सर,
विश्व हिंदू परीषदेचे व बजरंग दलचे पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात पद्मशाली समाज भगिनी, बांधव व इतर बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन संग्राम निलपत्रेवार यांनी केले व आभार प्रर्दशन सत्यजीत टिप्रेसवार यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश कोकुलवार, संग्राम निलपत्रेवार, सत्यजीत टिप्रेसवार,गणेश गुरूपवार, मधुकर सोकलवार, सौ चंद्रकला टीप्रेसवार, शिवम गुरुपवार आदींनी परिश्रम घेतले व रक्तदात्यानी रक्तदान करून आम्हास सहकार्य केले, त्या सर्वांचे गुरुपवार परीवार कडून खूप खुप आभार व धन्यवाद.
-
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा