बिलोली
वर्षातून एकदा नवराञ मोहत्सव साजरा केला जातो.नवराञ महोत्सव साजरा करीत असताना सर्वांना स्त्री च्या शक्तीची जाणिव असली पाहिजे.कारण पुरूषाच्या यशामध्ये स्ञी चा मोठा सहभाग असतो.छञपती शिवाजी महाराजांनीही स्त्री आदर करून चांगले धेय्य आपल्या नजरेसमोर ठेवले होते.असे प्रतिपादन विधान परिषदेचे सदस्य राम.पा रातोळीकर यांनी केले.
ते बिलोली येथील लघूळ मार्गावर असलेल्या महाशक्तीशाली दुर्गा माता मंदिराच्या वतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात बोलत होते.सर्वप्रथम आमदार राम पा.रातोळीकर यांच्या हस्ते महाशक्तीशाली दुर्गा मातेची विधिवतपणे पुजा अर्चना करून आरती करण्यात आली.त्यानंतर मंदिर समितीच्या वतीने आ.रातोळीकरांसह उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.या कार्याक्रमाचे प्रास्तविक करताना जेष्ठ पञकार गोविंद मुंडकर यांनी दुर्गा माता मंदिरासह शहरातील दोन्ही तलाव व लगतच्या महादेव व हनुमान मंदिरांची विस्तृत माहिती देऊन माता मंदिराच्या विकासाची भुमिका स्पष्ट केली.यावेळी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड,माजी नगराध्यक्ष यादवराव तुडमे,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष डाँ.माधव पा.उच्चेकर,संग्राम हायगल्ले,सभापती प्रतिनिधी लालू शेट्टीवार,शांतेश्वर पा.लघूळकर,दत्तराम बोधने,आनंद पा.बिराजदार,उमाकांत गोपछडे,आबाराव संगनोड,शंकर काळे,मोहन पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.यासमयी बिलोली येथील लहान मुलिंनी सुंदर अशी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.सदर कार्याक्रमासाठी बालाजी चुनडे,व्यंकट मुंडकर,खंडू खंडेराय,भाऊ कुलकर्णी,गंगाधर शिंदे,अर्जून खंडेराय,दिलीप उत्तरवाड,नितिन उप्पलवार,श्रीधर यंबडवार,शंकर जिलकरवार,राजू चुनडे,सतिष मुंडकर,गोटू खंडेराय आदींनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा