राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या कडून आज राज्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली. २ हेक्टर पर्यंत असलेल्या खरीप पिकांसाठी प्रतिहेक्टरी ८ हजार रुपये व फळबागांसाठी प्रतिहेक्टरी १८ हजार रुपये मदत देण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला असे आज जाहीर करण्यात आले ही शेतकऱ्यांना मदत करत आहेत की चेष्टा करत आहे अशा उद्देगित प्रश्न रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी केला आहे.
राज्यात अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला, आमचे वडीलधारी माणसे सांगतात की, अशा परतीचा पाऊस आमच्या उभ्या हायातीत पहिला नाही जो एका वर्षांचा पाऊस ऑक्टोबरच्या एका महिन्यात पडला व हातचे पीक गेले व वावरात पाणीच पाणी साचले त्यामुळे खरीब हंगामातील सोयाबीन, कापूस, ज्वारी, इत्यादी पीक गेलेच पण रबी हंगाम सुध्दा हातचा जाणार आहे.
सोयाबीन लागवडीचा एकरी २० हजार रुपये व कपाशीचा एकरी ३० हजार रुपये आहे.आणि राज्यपाल महोदय हेक्टरी ८ हजार रुपये मदत देणार आहेत?? ही आमची चेष्टा लागली काय? अरे आम्ही जगाला पोसनारे माणसे आज आम्ही संकटात असताना शासन म्हणून ही तुटपुंजी मदत करता.राज्यातील परिस्थितीचा डोळस आढावा घ्या व नंतर मदत जाहीर करा असे शिंदे म्हणाले.
आम्ही राज्यपाल महोदयांनी विनंती करतो शेतकऱ्यांना मदत हेक्टरी ५० हजार रुपये व पीक विमा योजना ही १०० टक्के लागू करा व शेतीची लाईट बील माफ करा. व शेतकऱ्यांच्या मुलांना महाविद्यालयातील संपूर्ण फी माफ करा व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्या असे केले तरच सामाजिक स्वास्थ्य ठीक राहील नाही तर शेतकऱ्यांचा असंतोष बाहेर येईल याची जबाबदारी आपली राहील आणि रयत क्रांती संघटना यासाठी राज्यात तीव्र आंदोलन करणार असे शिंदे जाहीर केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा