महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या समतादूत प्रकल्प च्या वतीने संविधान दिनानिमित्त "संविधान साक्षर ग्राम"उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.संपूर्ण महाराष्ट्रात समतादूत सामाजिक समतेच्या विचाराचा जागर करत असतात .त्याचाच एक भाग म्हणून एक महिन्यात १००% संविधान साक्षर ग्राम कास धरून लोकशाहीचा प्रचार करून या संकल्पनेतून या उपक्रमाचे उदघाटन संविधान दिन या दिवशी झाले .तेंव्हापासून समतादूतांमार्फत वाक्त्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चर्चासत्र, कार्यशाळा, आरोग्य शिबीर, महिला मेळावे, पथनाट्य, गाणी, संविधान वाचन ,प्रभात फेरी,संविधान प्रास्ताविक वाटप अशा उपक्रमाच्या माध्यमातून गावातील प्रत्येक समाजातील घटक, महिला, विद्यार्थी, पुरुष पदाधिकारी याना लोकशाही संविधान या बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी सामाजिक,शैक्षणिक, आर्थिक, व्यावसायिक व शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.या सर्व कार्यक्रमाचा समारोप हा बार्टी चे निबंधक यादव गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देगलूर चे उपविभागीय अधिकारी मा.शक्ती कदम तर प्रमुख पाहुणे म्हणून मरखेल चे पोलीस उपनिरीक्षक मा.लोणीकर यांची उपस्थिती होती .या कार्यक्रमात आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शिक्षक, ग्रामसेवक,तलाठी,सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष व समस्त गावकरी यांचे व मुलांचे सहकार्य लाभले .कार्यक्रमाची प्रस्तावना समतादूत जिल्हा प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे व सुत्रसंचलन दीपाली हाडोळे तर आभार दिलीप सोंडारे यांची मानले .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा