मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २ लाख पर्यंतची शेतकऱ्यांची केलेली कर्ज माफी घोषणेमुळे सातबारा कोरा करण्याची त्यांचीच वचनपूर्ती होत नाही आणि शेतकरी चिंता मुक्त होत नाही अशी टीका सरकारच्या कर्जमाफीवर रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी केली.
शिंदे म्हणाले की,उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होण्यापूर्वी राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माझे सरकार आल्यावर शेतकऱ्यांना कर्जांतून मुक्त करणार, चिंता मुक्त करणार, सातबारा कोरा करणार ,अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टर २५ हजार रुपये देणार अशा भीम गर्जना केल्या होत्या या सर्व घोषणाची त्याना विसर पडला आहे आणि ही फसवी कर्ज माफी देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम हे सरकार करत आहे.
३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या खरीब हंगाम (२०१९-२०) वर्षांतील ज्या शेतकऱ्यांने कर्ज घेतले ते शेतकरी जून २०२० मध्ये थकीत होतील म्हणजे या खरीब हंगामातील जे शेतीची अवकाळी पावसाने अतोनात नुकसान झाले,त्या शेतकऱ्यांना या कर्ज माफीचा लाभ होणार नाही आणि नुकसान भरपाई हेक्टरी २५ हजार रुपये मिळणार नाही ,अश्या दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे, या आघाडी सरकारने दिलेला शब्द पाळला नाही. केवळ धूळफेक करत आहे व अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे काम सरकार करत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा