२२ डिसेंबर २०१९

मुरुड येथील स्ञीयांच्या प्रजनन स्वास्थ्य प्रशिक्षणात नांदेडच्या पञकारांचा सहभाग



बिलोली - ( ता.प्र.) 

पुणे येथील सम्यक संस्था आयोजित  स्ञियांचे प्रजनन स्वास्थ्य , लिंगभाव या विषयावर आयोजित ग्रामीण पञकारांचे तिसरे प्रशिक्षण शिबिर रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड येथे संपन्न होणार असुन या प्रशिक्षणात नांदेड जिल्ह्यातील लोकमतचे गौतम लंके , पुण्यनगरीचे व अशोक लोणीकर  सहभागी होणार आहेत.

सन २०१७ मध्ये "सम्यक" संस्था, रानडे इन्स्टिट्यूट ऑफ जर्नालिझम आणि क्रांतजोती साविञीबार्इ फुले स्त्री अभ्यास केंद्र - पुणे विद्याीपीठ यांनी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील १० जिल्ह्यांमधील २१ पत्रकारांचे प्रशिक्षण केले होते. हे प्रशिक्षण लिंगभाव व्यवस्था, स्त्रियांचे प्रजनन स्वास्थ्य या मुद्द्यांवर केले होते. गर्भलिंगनिदान आणि कायदेशीर गर्भपात हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत आणि या मुद्द्यांबाबत वार्तांकन करताना आपण जोखीम बरतली पाहिजे हा या प्रशिक्षणाचा उद्देश होता.
या प्रशिक्षण कार्यक्रमानंतर महाराष्ट्रातील विविध प्रांतांमधील या पत्रकारांनी अतिशय जबाबदार पत्रकारिता केली. याबाबत त्यांना ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रजिया पटेल यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रही देण्यात आले आहेत. हे सर्व पत्रकार आता पुन्हा रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड येथे भेटत आहेत. या भेटीमध्ये स्त्री पत्रकारांचे अनुभव, प्रजनन हक्कांबद्दल बातमी करणाऱ्या पत्रकारांचे अनुभव सादर होणार आहेत. व त्यावर चर्चा होणार आहे.
यापुढे पत्रकारिता आणि स्त्रियांचे आरोग्य या मुद्द्यावर प्रयत्न करण्याचा निर्धार "सम्यक" ने केला आहे. या कामाचा विस्तार महाराष्ट्रातील आणखी काही जिल्ह्यांमध्ये करणार असल्याचे "सम्यक" च्या जयश्री देसाई यांनी सांगितले.दि.26 डिसेंबर ते 30 डिसेंबर पासुन हे प्रशिक्षण रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड येथे संपन्न होणार असुन या प्रशिक्षण शिबिरात नांदेड जिल्ह्यातील कासराळी चे  लोकमतचे पञकार गौतम लंके , पुण्यनगरीचे भिमराव बडुरकर , अशोक लोणीकर हे ग्रामीण पञकार सहभागी होणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...