नागपूर - जानेवारी महिन्यात होणाऱ्या वाशीम व अकोला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका रयत क्रांती संघटना निवडणूक लढवणार आहे,भाजपाने मित्रपक्ष म्हणून सन्मानपूर्व आमच्या कार्यकर्त्याला जागा दिल्या तर त्याच्यासोबत किंवा अपक्ष निवडणूका लढवणार आहोत अशी माहिती रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आ.सदाभाऊ खोत यांनी दिली.
वाशीम व अकोला जिल्हा परिषदेच्या निवडणुका आढावा बैठक आज नागपूर येथे आयोजित केली होती.
सदाभाऊ खोत यांनी जिल्हा परिषद गट निहाय आढावा या बैठकीत घेतली व दोन्ही जिल्ह्यातील इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांशी खुली चर्चा केली.
यावेळी रयत क्रांती संघटना युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे,राज्य प्रवक्ते जितूभाऊ अडेलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.युवती प्रदेशाध्यक्ष प्रियाताई लोडम,वाशीम जिल्हा अध्यक्ष अरविंद पाटील,अकोला जिल्हा अध्यक्ष दिलीप पाटील उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा