सर्व स्थरातुन दोन्ही परीवारावर होतोय अभिनंदनाचा वर्षाव
बिलोली ता.प्र. १७ मार्च
सध्या महाराष्ट्रासह देशात कोरोना या विषाणुने धुमाकुळ घातला आसुन या पार्श्वभूमीवर शासनाने सार्वजनिक कार्यक्रम ,धार्मिक याञा, विवाह सोहळे,शाळा काँलेज,सिनेमागृह,आठवडी बाजार पेठ,आदी ठिकाणी जनसमुदाय रोखण्यासाठी बंदचा निर्णय घेतला आसुन या निर्णयास प्रतिसाद देत बिलोली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नागनाथराव (नागराळे) पाटील सावळीकर यांचे कनिष्ठ चिरंजीव संतुकराव यांचा विवाह तालुक्यातील ममदापुर येथिल चि.सौ.का.रत्नेश्वरी मारोती पाटील शिवशेट्टे यांचा गेल्या तिन महिण्यापुर्वी जुळलेले हा विवाह येत्या दि.१९ मार्च रोजी सावळी येथे संपन्न होणार होता.यासाठी दोन्ही परिवारांकडुन विवाहाची जोरदार तयारी पण अंतिम टप्प्यात होती.शासनाने केलेल्या अव्हाणास प्रतिसाद व सामाजिक बांधिलकी जोपासत दोन्हि परिवारांकडुन हा विवाह पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊन जेष्ठ विधितज्ञ अँडो.कुंचेलीकर अँडो.शंकरराव कुरे,मा.उपसभापती दत्तराम बोधने,रा.काँग्रेसचे शहराध्यक्ष अर्जुनराव अंकोशकर ,आंतर भारती शिक्षण संस्थेचे सचिव चंद्रशेखर पाटील ,पञकार संघ तालुका अध्यक्ष राजु पाटील शिंपाळकर पञकार,विठ्ठल चंदनकर, गंगाधर प्रचंड ,गौसोदिन कुरेशी यांच्यासह अनेक मान्यवरानी हा निर्णय प्रशासनास कळवण्यासाठी आज दि.१७ मार्च रोजी तहसिलदार विक्रम राजपुत याची भेट घेऊन सदरच्या निर्णयाची माहिती दिली.या वेळी या निर्णया बद्दल तहसिलदार राजपुत यानी दोन्हीही परिवारांचे अभिनंदन करुन या शासन निर्णयास सर्वानी सहकार्य करण्याचे या वेळी अवहान केले.सदरील निर्णयाचे तालुक्यातील सर्वस्थरातुन कौतुक होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा