२१ मार्च २०२०

उद्या रविवारी जनता कर्फ्यू चे सर्वानी पालन करावे- बालाजी बच्चेवार



    देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यु च्या आव्हानाला स्वयं स्फुर्तपने प्रतिसाद देवून रविवार दि. 22मार्च लक्षात ठेवा सकाळी 7 ते रात्री 9 वाजे पर्यंत घराबाहेर न पडता सहभागी होण्याचे आव्हान भाजप नेते बालाजी बचेवार यांनी केले आहे.
आपणा सर्वांना माहितच आहे की, संपूर्ण जगात 'करोना' विषाणूच्या प्रादुर्भावाने जगात हाहाकार माजविला आहे.  या जागतिक महामारीच्या समुळ उचटनासाठी आपण ही सज्ज झाले पाहिजे; यासाठी आपण सर्वजण मिळून एकत्रितपणे याचा सामना करने गरजेचे आहे. यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी काल यासंदर्भात देशाला उद्देशून केलेले संबोधनही आपण ऐकलं असेलच. त्यांनी येत्या रविवारी, दि.22 मार्च रोजी 'जनता कफ़र्यू'चे ही आवाहन त्यांनी केले आहे. याबरोबरच आपण कोणती खबरदारी घ्यावी व जनता कर्फ्यु का महत्वाचा अस आहे याविषयीही त्यांनी सर्वांना संबोधित ही केले आहे.   आशा महा संकटसमयी सर्व देशवासीयांनी एकत्रित कृती करून एक जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य बजवावे, अशी आशा आहे.
त्याबरोबरच दुसरीकडे  हजारो लोक मोठी जोखीम घेऊन जनतेची सेवा सातत्याने करीत आहेत, जसे डॉक्टर, परिचारिका, रुग्णालयातील कर्मचारी, पोलिस, मीडिया बांधव, सरकारी कर्मचारी, रेल्वे आणि हवाई वाहतुकीशी संबंधित लोक  या सर्वांबद्दल दि. 22 मार्च रोजी सायं. 5 वाजता कृतज्ञता व्यक्त करावी असे मा.पंतप्रधानांनी आवाहन केले आहे.
'मी निरोगी तर माझा देश निरोगी ' हे आपण विसरता कामा नये. चला, आपण सर्वजण एकत्रितपणे संकल्प करून या. जागतिक अपतीचा सामना करू या.  सर्वांनी एक सामूहिक जबाबदारी म्हणून याचे सर्वांनी काटेकोर पणे पालन करावे असे आव्हान भाजपा नेते तथा  माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी बचेवार यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...