१७ मार्च २०२०

नांदेड जिल्हा केमिस्ट असो. तरफे कोरोना व्हायरस जनजागरण मोहीम



नांदेड:(जिल्हा प्रतिनिधी)

जगभराने धसका घेतलेल्या कोरोना विषाणू संसर्ग रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे नांदेड अन्न औषधी प्रशासन व नांदेड जिल्हा केमिस्ट असो. तरफे जिल्हा भर जनजागरण मोहिमेची सुरुवात आज दि.17 मार्च रोज मंगळवार रोजी नांदेड  येथून करण्यात आली.

जगभरात धसका घेतलेल्या कोरोना विषाणू संसर्ग रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासनाने 31 मार्च 2020 पर्यत सर्व शाळा,महाविद्यालय,चित्रपट गृह, मॉल, स्विमिंग पूल,व गर्दीचे ठिकाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.फक्त अत्यावश्यक किरणा व औषधी दुकान वगळून.
नांदेड जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन हे सामाजिक संस्था आहे या  संस्था मार्फ़त अनेक वेळेत सामाजिक काम करत असते.कोरोना विषाणू संसर्ग रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार व नांदेड  अन्न औषधी प्रशासन यांना सोबत घेवून  कोरोना जनजागरण मोहिलेला अन्न औषधी प्रशासन चे सह आयुक्त निमसे यांचा हस्ते  नांदेड शहरातून सुरुवात करण्यात आली या मोहिमेचा उद्दिष्ट सामान्य नागरिकांना या रोगा संदर्भात माहिती व्हावी व नागरिकांना यांची सविस्तर माहिती रहावी यासाठी ही मोहीम  राबविली जात आहे . यावेळी नांदेड जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो. अध्यक्ष अशोक गंजेवार, सचिव संतोष दमकोंडवार,सागर दादा,मराठवाड़ाचे  उपाध्यक्ष सदानंद मेडेवार,दिपक कोठारी,मुन्ना जैन,अनिल तोषनीवाल,लक्ष्मीकांत लोकमनवार,गुरमीत टुटेजा,धर्मेंद हुंडी वाला आदि सदस्य उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...