हत्तीरोग एक दिवसीय औषधोपचार मोहीम मुल्यमापन करीता डॉ मनजीतसिंग चौधरी यांनी नायगाव तालूक्यात दिली भेटी
नायगाव- हत्तीरोग एक दिवसीय सामुदायिक औषधोपचार मोहीम दि.२ ते १२ मार्च या कालावधीत नांदेड जिल्ह्यात राबविण्यात आली होती. सदरील मोहिमेचे मुल्यमापन करण्याकरीता डॉ मनजीतसिंग चौधरी जागतिक आरोग्य संघटना प्रतिनिधी यांनी आज नांदेड जिल्ह्यात मौजे नावंदी व धुप्पा ता.नायगांव येथे भेट दिली व गोळ्या खाऊ घालण्यात आले कि नाही याची पाहणी केली. सर्वांनी गोळ्या खाल्या बद्दल समाधान व्यक्त केले. जे कोणी अजून गोळ्या घाल्या नसतील त्यांनी गोळ्या सेवन करावे असे गावकरी यांनी सांगितले.
यावेळी डॉ आकाश देशमुख जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी नांदेड, सत्यजीत टिप्रेसवार जिल्हा पर्यवेक्षक, माधव कोल्हे हिवताप पर्यवेक्षक, दामोदर मुंडे आरोग्य सहाय्यक, चव्हाण आरोग्य कर्मचारी, विठ्ठल आढाव, संदिप कारामुंगे, ज्ञानेश्वर कासले क्षेत्र कर्मचारी, आरोग्य सेविका, अंगणवाडी मदतनीस,आशा कार्यकर्ती हजर होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा