निराधार, बेवारस व वेडसर लोकांना अन्नदान
प्रतिनिधी, कंधार
कंधार शहरात आढळणाऱ्या निराधार, बेवारस व वेडसर नागरिकांना काही युवक पुढाकार घेऊन अन्नदान करीत आहेत. एक वळचे अन्नदान करुन या युवकांनी माणुसकीचे दर्शन घडविले आहे. त्यामुळे अशा नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण कंधार लाॅकडाऊन करण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांवर निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे निराधार, बेवारस व वेडसर नागरिकांवर उपसमारीची वेळ आली. त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
त्यामुळे स्वच्छतादूत राजेश्वर कांबळे, सय्यद हबीब, मुरलीधर थोटे, अॅड.सिध्दार्थ वाघमारे, शेख शादुल, परशुराम केंद्रे, अरशद खुरेशी आदी युवकांनी पुढाकार घेऊन निराधार, बेवारस व वेडसर असलेल्या लोकांना व छोटी दर्गाह मध्ये अडकलेल्या अनेक भाविकांना अन्नदान करीत आहेत. या युवकांनी अन्नदान करुन माणुसकीचे दर्शन घडविले आहे. त्यामुळे अशा नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा