सामाजिक न्याय मंत्री आणि दिव्यांग कल्याण आयुक्तांच्या निर्देशाला "खो"दिव्यांगांवर ऊपासमारीची वेळ :- राहुल साळवे
नांदेड जिल्हा प्रतिनिधी दि 10 :- निसर्गाने जन्मताच अपंगत्व दिलेल्या नांदेड जिल्ह्यातील शेकडो बेरोजगार अंध दिव्यांगावर या लाँकडाऊनमुळे ऊपासमारीची वेळ आली आहे आणि हि वेळ आणनारे नांदेड जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनच पुर्नत: जबाबदार आहे कारण भीक नको आमचा हक्क हवा.सहानुभूती नको विश्वास दाखवा असे म्हणनार्या दिव्यांगांना सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्वराज्य संस्था यांच्याकडील बेरोजगार दिव्यांगांचा शासन निर्णयीत राखीव ५% निधी 31 मार्च 2020 पुर्वी पुर्णत: खर्च करून घेण्यास जिल्हा प्रशासन अक्षरशा अपयशी ठरले आहे तसेच गत अनेक महिण्यापासुन जिल्ह्यातील विविध तालुक्यात निराधारांचे मानधन हि अद्याप दिले गेले नाही.अशातच कोरोना या महाभयंकर रोगामुळे संपूर्ण राज्यासह नांदेड जिल्हात हि लाँकडाऊन व संचारबंदी लागु केली आहे या संचारबंदी काळात हालचाल करू न शकणाऱ्या दिव्यांगांना सुविधा मिळाव्या यासाठी दिव्यांग कल्याण आयुक्त पुणे सौ.प्रेरणा देशभ्रतार यांनी दि 26/03/2020 रोजी सर्व सहा हि विभागीय आयुक्तांना पत्र देऊन अशा दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तुंची किट.आरोग्यासाठी आवश्यक साहित्य आणि कम्युनिटि किचनसह पुढील एक महिन्याची पेंशन अँडवान्स मध्ये देण्याबाबत पत्र पाठविले आहे तसेच विभागीय आयुक्त स्तरावरून सर्व जिल्हाधिकारी यांना निर्देश देण्यात यावे अशी विनंती हि केली आहे परंतु विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांना कोणते निर्देश दिले अथवा अद्याप दिलेच नाहीत हे गुलदसत्यातच असताना नुकतेच मा.मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांनी जेष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना घरपोच वस्तु देण्या संदर्भात सर्व जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले आहेत तसेच सामाजिक न्याय मंत्री मा.धनंजय मुंडे यांनी सुद्धा दिव्यांगांना आणि जेष्ठ नागरिक यांना एक महिणा पुरेल एवढे राशन.जिवनावश्यक वस्तुची किट.हँन्ड सँनीटायझर.मास्क.फिनेल.डेटाँल.रूमाल आदि साहित्य पुरविण्या बाबत कळवले असतांना नांदेड जिल्ह्यात काहि दिव्यांग शाळा धारकांकडुन तसेच सेवाभावी संस्था कडुन जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या सांगन्यावरून दिव्यांगांना भाजीपाल्या व्यतीरिक्त कुठलेच धान्य किंवा वस्तू दिले जात नाही तर मनपा नांदेड कडुन हि दिव्यांगांची अवहेलनाच केली जात आहे मनपा BLO कडुन हालचाल करू न शकणाऱ्या दिव्यांगांना मागणीनुसार पैसे घेऊन ऊपरोक्त जीवनावश्यक वस्तू घरपोच आणुन दिले जाणार आहे हि फारच खेदाची आणि निंदनीय बाब आहे.एकिकडे संचारबंदिच्या काळात दिव्यांगांना काही अडचण निर्माण झाल्यास काही दुरध्वनी क्रमांक दिव्यांग व्यक्तीच्या निदर्शनास आणुन देण्याबाबत मा.प्रादेशिक आयुक्त. समाज कल्याण विभाग सर्व, मा.सहायक आयुक्त समाज कल्याण.मुंबई शहर/ऊपनगर आणि मा.जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सर्व यांना दिव्यांग कल्याण आयुक्तांनी तात्काळ व महत्त्वाचे पत्र दिले आहे आणि याची माहिती सर्व प्रसारमाध्यमातुन दिव्यांगापर्यंत पोहचविण्यास कळविले आहे या पत्रात विभागीय आयुक्त औरंगाबाद यांचा 0240 - 2350044/2331294/2331221 हा नंबर दिला आहे तर जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडचा 02462 - 237101 हा नंबर दिला आहे या नंबरवर मदतीसाठी दिव्यांगांनी फोन केला असता तेथील कर्मचारी टाळा टाळ करत दुसर्या नंबरवर 02462 - 235077 या नंबरवर फोन करण्यास सांगतो परंतु याहि नंबरवर मदत न मिळत असल्यामुळे जिल्हाभरातील शेकडो दिव्यांग मोठ्या संकटात सापडला आहे या सर्व बाबींची माहिती बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीतीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी आपले सरकार पोर्टलवर मा.मुख्यमंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री यांना तक्रार हि दाखल केली आहे परंतु कोरोना या संसर्गाचा शिरकाव तर दुरच पण भुकबळीमुळे/ऊपासमारीमुळे कुठे जीव जातो कि हि भीती दिव्यांगात पसरली आहे यामुळे जिल्हा प्रशासनाने तत्काळ ऊपाय योजणा करावी असे राहुल साळवे यांनी एका प्रसिदधी पत्रकात म्हटले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा