कोरोनाला टाळण्यासाठी आणि डॉ बाबसाहेबांना अभिवादन करण्यासाठी लघुळ ता.बिलोली जी.नांदेड या गावात कौटुंबिक वाचन अभियान काल पासून सुरू केले आहे.
?
हे अभियान 1 एप्रिल सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त सुरू करून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी 14 एप्रिल रोजी त्यांना अभिवादन करून समाप्त करण्यात येणार आहे.
गावात आपापल्या घरात कुटुंबियांसमवेत दररोज सायंकाळी 7:00 ते 7:30 या वेळेत महापुरुषांच्या पुस्तकांचे क्रमशः वाचन सुरू केले आहे.
लॉकडाऊनच्या काळातील या कौटुंबिक वाचन अभियानाचा मुख्य हेतू हा आहे की ;
1
या माध्यमातून महापुरुषांच्या विचारांचा जागर घरोघरी झाला पाहिजे.
2
आपल्या आईवडीलांना, लहान भावंडाना घरात दररोज वाचन करायला बसण्याची सवय लागली पाहिजे
3
कोरोनाशी संघर्ष करताना घरातच बसून प्रशासनाचे नियम पाळले पाहिजेत
4
बेभान होऊन महापुरुषांच्या जयंत्या साजरी करण्यापेक्षा भान ठेवून पुस्तक वाचन अभियानाने महापुरुषांच्या जयंत्या साजरी झाल्या पाहिजेत
5
वाचनाने माणूस समृद्ध व विवेकी बुद्धीचा बनतो .त्याचे मन आणि मेंदू बळकट बनते.म्हणून सर्व जनतेत वाचनाची आवड निर्माण करणे.
6
महाराष्ट्र ही पुरोगामी महापुरुष व संतांची भूमी आहे.इथे विज्ञानवादी विचारांची ज्योत सतत तेवत असली पाहिजे आणि हे वैज्ञानिक विचार व वैज्ञानिक जाणिवा महापुरुषांच्या चरित्रातून समजून येतात.म्हणून या अभियानात महापुरुषांचे चरित्र पुस्तके क्रमशः वाचले जाणार आहेत.
7
सोशल मीडियाच्या विस्फोटामुळे वाचन संस्कृती लोप पावत आहे .वाचन नसल्यामुळे चिंतन आणि मंथनाची पोकळी निर्माण झाली आहे.या वाचन अभियानाच्या माध्यमातून पुस्तके वाचलेलं मस्तक चिंतन आणि मंथन करायला सुरुवात करेल म्हणून हे अभियान सुरू करण्यात आले आहे.
8
महापुरुषांचे विज्ञानवादी विचार हे माणसांना शोषणमुक्त होण्याची प्रेरणा देतात.त्या परिवर्तनाची सुरुवात घरातील मातेपासून व्हायला पाहिजे म्हनुन या अभियानात माता-पिता, लहान मुले यांना सहभागी करून घेऊन कौटुंबिक वाचन अभियान सुरुवात केले आहे.
कसे आहे या कौटुंबिक वाचन अभियानाचे स्वरूप
▪️1 एप्रिल ते 14 एप्रिल पर्यंत दररोज सायंकाळी 7:00 ते 7:30 पर्यंत आपापल्या घरात आई-वडील,पती-पत्नी व लहान बाळांसह क्रमशः पुस्तक वाचन केले जाते.
▪️या अभियानात दररोजच्या पुस्तकं वाचनाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करून , संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे वाचन करून केली जाते.
▪️उद्देश पत्रिकेच्या वाचनानंतर एकजण मोठ्या आवाजात पुस्तक वाचून दाखवतो
▪️ पुस्तक वाचनानंतर त्या मजकुरावर कुटुंबातील सदस्य साधक बाधक चर्चा करतात
▪️चर्चेनंतर वाचक इतर सदस्यांना काही समजावून सांगतो व त्या दिवशीच्या या उपक्रमाचा समारोप होतो.
गावात प्रतिसाद कसा मिळत आहे
▪️वास्तविक पाहता *कौटुंबिक पुस्तक वाचन अभियान* ह्या अभिनव उवक्रमाला अत्यंत भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
▪️अशिक्षित आई वडिलांसह आजी आजोबाही पुस्तक वाचताना लक्षपूर्वक ऐकण्यात तल्लीन होत आहेत.
▪️पुस्तकं वाचन झाल्यावर उर्स्फुतपणे गावाच्या कॉमन व्हॅट्सप ग्रुपवर सर्वजण फोटो पाठवून उपक्रमात सहभागी झाल्याबद्दलचा आपला अनुभव शेअर करतात.
▪️गावातील लोकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असली तरीही शिक्षण हे स्व उद्धाराचे महत्वाचे हत्यार आहे यावर सर्वांचा विश्वास आहे.त्यामुले कुटुंबातील एखादा मुलगा तरी मोठ्या शहरात चांगल्या महाविद्यालयात शिक्षणासाठी आहे .आणि त्याच युवकांनी मिळून या उपक्रमाला सुरुवात करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
सारांश:-
वाचनाने घडलेली माणसांची मस्तकं ही परिपूर्ण माणुस घडण्यासाठी अत्यंत मदत करतात.म्हनुन या अभियानाच्या माध्यमातून पुस्तके वाचणारे गाव अशी आपली वेगळी ओळख नक्कीच निर्मान करेल हे निश्चित.
त्याचबरोबर महामानव डॉ बाबसाहेबांची जयंती नाचून नाही तर पुस्तके वाचून साजरी करण्याची ही अनोखी पद्धत निश्चितच महाराष्ट्रात नवा आदर्श निर्माण करणारी आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा