"'लाँकडाऊन काळात मनपा हद्दितील गरजु दिव्यांगांसाठी आयुक्त सरसावाले घरपोच राशन किट देत केला तत्काळ 5% निधी वाटप""
बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीतीने मानले आयुक्तांसह मनपा प्रशासनाचे आभार :- राहुल साळवे
नांदेड जिल्हा प्रतिनिधी दि 26 :- सध्या कोरोना या विषाणुचा वाढत्या प्रभावामुळे नांदेड जिल्ह्यासह संपुर्ण देशात (लाँकडाऊन) संचारबंदी लागु करण्यात आली आहे. या लाँकडाऊनमुळे नांदेड शहर मनपा हद्दितील गरजु बेरोजगार दिव्यांगांवर ऊपासमारीची वेळ आली असता नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त श्री.सुनील लहाने.ऊपआयुक्त हिंगोले आणि ऊपआयुक्त सरदार अजितपालसिंघ संधु यांनी तातडीची बैठक घेऊन श्री.अशोक सुर्यवंशी प्रकल्प संचालक एनयुएलएम यांची अशा गरजु दिव्यांगांना घरपोच जेवण देण्याकरिता समन्वयक अधिकारी म्हणून नेमणूक केली.समन्वयक अधिकारी म्हणुन नेमणुक केल्याचे पत्र हाती मिळताच अशोक सुर्यंवशी यांनी दि 11 एप्रिल 2020 रोजी पासुनच एनयुएलएमच्या पाच कर्मचार्यांची टिम आणि सहकार्यासाठि बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीतीचे अध्यक्ष राहुल साळवे आणि ऊपाध्यक्ष संजय धुलधाणी यांना सोबत घेऊन शहरातील विविध प्रभागात जाऊन गरजू दिव्यांगांना 8 दिवस जेवण नेऊन दिले. या दरम्यान रोज 135 ते 140 गरजु दिव्यांगांना देण्यात येत असलेल्या जेवणासाठी 5 ते 6 तास रोज लागत होते तसेच ऊष्णतेचे तापमान वाढल्यामुळे बनविलेले जेवणाचे डब्बे खराब होत होते तसेच डब्बा देत असतांना काहि सुद्रूढ व्यक्तीकडुन सोशल डिस्टंसींचा फज्जा ऊडविला जात होता सदरिल हि सर्व बाब आणि येणारी अडचण राहुल साळवे यांनी मनपा आयुक्त श्री.सुनील लहाणे यांना कळविले आणि अशा गरजु दिव्यांगांना घरपोच राशन किट द्यावी आणि आर्थिक अडचण असणाऱ्या तसेच यापुर्वी 5% निधीचा लाभ न घेणाऱ्या दिव्यांगांच्या खात्यावर 5% राखीव निधीतुन तत्काळ निधी वितरीत करावे अशी विनंती केली.राहुल साळवे यांच्या या विनंतीला कर्तव्यदक्ष मनपा आयुक्त श्री.सुनिल लहाणे यांनी तत्काळ दखल घेत मनपा हद्दितील गरजु दिव्यांग ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही तसेच राशन कार्ड असुन आँनलाईन नसल्यामुळे राशन भेटत नसलेल्या विविध प्रभागातील 57 दिव्यांगांना राशन किट अशोक सुर्यवंशी यांच्या टिमच्या माध्यमातुन घरपोच देण्यात आली तसेच ज्या दिव्यांगांना आजवर मनपाकडुन राखीव निधीचा लाभ भेटला नाही अशा एकुण 97 दिव्यांगांच्या थेट बँंक खात्यात (RTGS) डिबीटि द्वारे 15.000 रूपये वैयक्तिक आणि 25.000 रूपये व्यवसायीक अशा दोन प्रकारे निधी तत्काळ वितरीत करण्यात आला या वितरणामध्ये 21 गरजु दिव्यांग लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभ मागणीनुसार म्हणुन प्रत्येकि 15.000 रूपये आणि 76 गरजु दिव्यांगांना व्यवसायीक मागणीनुसार प्रत्येकि 25.000 रूपये अशा प्रकारे एकुण तत्काळ 22 लक्ष 15 हजार रूपये खर्च करण्यात आला.संकट काळात महानगरपालिका आयुक्त.ऊपायुक्त यांनी गरजु बेरोजगार दिव्यांगांना केलेल्या या मदती बद्दल बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती नांदेड कडुन मनपा प्रशासनाचे आभार मानले तसेच अशाच प्रकारचा संकटकालीन ऊल्लेखनीय अभिनव ऊपक्रम नांदेड जिल्ह्यातील सर्व नगरपंचायती. नगरपालिका/नगरपरिषदा.ग्रामपंचायती.
पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद यांनी हि करावा असे राहुल साळवे यांनी एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा