२५ एप्रिल २०२०

कोरोना च्या जनजागृती पोस्टर चे प्रदर्शन करुन सामाजिक संदेश देण्यात आले



(बिलोली/वार्ताहर)
कोरोना विषाणूचा संकट आज संपूर्ण भारतावर आलेला आहे.   आपला व आपल्या कुंटुबियाचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी घरात राहून प्रशासनास सहकार्य करावे अशी जनजागृती पोस्टर च्या माध्यमातून करण्यात आली आहे.सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या येथील अल ईम्रान प्रतिष्ठाण या सेवाभावी संस्थेच्या वतीने कोरोना वर आधारित  पोस्टर चे अनावरण  बिलोली चे उपविभागिय पोलीस अधिकारी डाँ.सिध्देश्वर धुमाळ यांच्या हस्ते दि.२५ एप्रिल शनिवारी करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षापासून अल ईम्रान प्रतिष्ठाण बिलोली ही संस्था वृक्षारोपण,कला,क्रिडा,सांस्कृती,व्यसनमुक्ती,स्वच्छता,भ्रुण हत्या,एडस जनजागृती,कुष्ठरोग,क्षयरोग आदि राष्ट्रीय कार्यक्रम निस्वार्थ करित आहे.भारत सरकारच्या युवा कार्यक्रम एंवम क्रिडा मंञालयाचा उत्कृष्ट युवा मंडळ पुरस्कार तर महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाकडून छञपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने संस्थेला सन्मानित करण्यात आले.
◼या पोस्टर चे अनावरण प्रसंगी अल ईम्रान प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष तथा वार्ताहर  प्रा.मोहसीन खान,वार्ताहर शिवराज रायलवाड माजी नगरसेवक लक्ष्मण शेट्टीवार यांच्यासह उपविभागिय पोलीस कार्यालयाचे ए.पी.आय तायवाडे पी.आर.,सिध्दापूरे ए.बी.,वाघमारे जी.बी.,कर्णे के.जी.,स्वामी एस.एम,शेख.मौलाभई आदि पोलीस कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...