२३ एप्रिल २०२०

कृष्णा या बालकाने पंतप्रधान सहायता निधीला केली मदत



नायगाव  बाजार तालुका प्रतिनिधी                            येथील येथील व्यापारी राजेश्वर उद्धवराव मेडेवार यांचा अकरा वर्षाचा नातू कृष्णा राहुल मेडेवार या  चिमुकल्याने  कोव्हीड-19 करीता पंतप्रधान सहायता निधीस अकरा हजार रुपयांची तसेच गोरगरिबांसाठी  अन्नधान्याच्या 11 किटस मदत  केली आहे. आज सदर चिमुकल्याचा वाढदिवस आहे.  वाढदिवस घरीच साधेपणाने साजरा करुन त्यांनी पंतप्रधान सहायता निधीस मदत केली आहे.                                नायगाव येथील कृष्णा राहुल   मेडेवार या 11 वर्षाच्या चिमुकल्यांने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा खर्च सध्या राज्यात कोरोना सारख्या विषाणूच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने  शासनाला हातभर लागावा म्हणून आपला खारीचा वाटा  म्हणून कृष्णा राहुल मेडेवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोविड-19 करिता पंतप्रधान सहायता मदत निधीस म्हणून अकरा हजार रुपयाची देणगी व अन्नधान्याचे 11 किटस कृष्णाचे आजोबा  राजेश्वर उद्धवराव मेडेवार  यांनी तहसीलदार सुरेखा नांदे  त्यांच्याकडे धनादेश  दिला तसेच गोरगरिबांना लागणारे ग्रह उपयोगी अन्न वाटपाचे अकरा किट्स यामध्ये तांदूळ गहू तेल तो साखर मिरची मीठ साबण अधि वस्तूचे तहसीलदार यांच्या स्वाधीन करण्यात आले यावेळी  राजेश्वर  मेडेवार ,राहुल मेडेवार ,कृष्णा मेडेवार ,कृष्णाचे  शिक्षक  प्राचार्य के हरे बाबु सर ,पत्रकार गजानन चौधरी यांच्या उपस्थिती होती विशेष बाब आशी आहे की कृष्णाचे पंजोबा स्वतंत्र सैनिक कै, उद्धवराव मेडेवार यांनी आपल्या काळातील शासनाने दिलेले मानधन गोरगरिबांच्या साठी वाटप करीत होते  .कृष्णा च्या आजोबा आजी आईवडिलांनी सह  मेडेवार परिवारांनी कृष्णाचा वाढदिवस साधेपणाने घरातच साजरा करून  आनंद व्यक्त केला  कामगिरीबद्दल राजेश्वर मेडेवार परिवाराचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...